Home नांदेड भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिगंबरराव देशमुख विद्यालय कांडाळा येथे उत्साहात साजरा.

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिगंबरराव देशमुख विद्यालय कांडाळा येथे उत्साहात साजरा.

59
0

आशाताई बच्छाव

IMG-20220816-WA0040.jpg

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव दिगंबरराव देशमुख विद्यालय कांडाळा येथे उत्साहात साजरा.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)

नायगाव-
कांडाळा श्री दिगंबरराव देशमुख प्राथमिक व माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय कांडाळा येथे भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मान्यवरांचा उपस्थित उपस्थितीत पार पडला प्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री सर्जेराव देशमुख हे अध्यक्ष आणि उपस्थित होते. तसेच भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ज्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री नागेश पाटील बेलकर बळेगावकर उपस्थित होते या कार्यक्रमाला मार्गदर्शक म्हणून सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री काकडे सर जनता हायस्कूल कवठा तसेच संस्थेचे उपाध्यक्ष श्री ओमप्रसाद सर्जेराव देशमुख हे देखील उपस्थित होते .
प्रथम या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सर्जेराव देशमुख साहेब यांचे स्वागत प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री राठोड आर एस सर यांनी केले तर या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री नागेश पाटील बेलकर बळेगावकर यांचे स्वागत माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री देशमुख सर यांनी केले तर या कार्यक्रमाचे मार्गदर्शक असलेले सेवानिवृत्त मुख्याध्यापक श्री काकडे सर यांचे स्वागत शिंदे पी एम सर यांनी केले.
मान्यवरांच्या सत्कार झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा विविध कला गुण व सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला यानंतर प्रमुख पाहुण्यांचे भाषण झाले श्री बेलकर पाटील म्हणाले की स्वातंत्र्यासारखे दुसरे सुख नाही हे जाणूनच भारतीय स्वातंत्र्यासाठी अनेकांनी आपले प्राण पणाला लावून प्रयत्न केले तसेच आपणही भारताला महासत्ता बनवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
मार्गदर्शन पर विचार श्री काकडे सर यांनी आपले विचार मांडले आपल्या विचारात त्यांनी असे मानले की जहा डाल डाल पे सोने की चिडिया करती है बसेरा वो भारत देश है मेरा या ओळी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी पुन्हा एकदा क्रांती घडवून आवश्यक आहे आणि प्रत्येकाच्या मनात देश भावना जागृत होणे आवश्यक आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सर्जेराव देशमुख यांचे अध्यक्ष भाषण झाले अध्यक्ष भाषणामध्ये श्री सर्जेरावजी देशमुख साहेब यांनी आपले विचार मांडत असताना म्हणाले की देशासाठी समर्पण त्या व भारताचे ब्रीद म्हणजे सत्यमेव जयते या गोष्टी प्रत्येकाने केला पाहिजे तरच आपण महासत्ता बनवण्याचे स्वप्न साकार होईल.
या कार्यक्रमाला धानोरा व कांडाळा गावातील पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री खरटमोल एस.बी यांनी केले तर सर्व उपस्थित मंचावरील मान्यवरांचे व दोन्ही गावातील पालकांचे आभार श्री शिंपाळे शंकर दाजीरावपाटील यांनी की मानले .

Previous article३ ऑगस्ट ला देखील अपघातामागचा प्रयत्न झाला असल्याचा विनायक मेटेंच्या कार्यकर्त्याचा दावा; अपघातामागचं गूढ वाढलं!
Next articleप्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाने वृद्ध महिलेला दिले जीवदान
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here