Home वाशिम शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला आग दोन बैल, एक गोरा, एक गाय जागीच ठार व...

शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला आग दोन बैल, एक गोरा, एक गाय जागीच ठार व इतर साहित्याची झाली राख रांगोळी यामुळे शेतकऱ्याचे झाले खूप मोठे नुकसान

110
0

आशाताई बच्छाव

IMG-20220811-WA0074.jpg

शॉर्टसर्किटमुळे गोठ्याला आग दोन बैल, एक गोरा, एक गाय जागीच ठार व इतर साहित्याची झाली राख रांगोळी यामुळे शेतकऱ्याचे झाले खूप मोठे नुकसान     वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

मंगरुळपीर तालुक्यातील पारवा येथील शंकर विठ्ठल सावके यांच्या जनावरांच्या गोठ्याला 9 ऑगस्ट च्या मध्यरात्री अचानक आग लागुन दोन बैल, ऐक गोरा , एक गाय, व संपुर्ण कोठा जळुन खाक झाले. यामध्ये शेतकऱ्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने तात्काळ पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.शंकर सावके यांचा दोन वर्षांपूर्वी विहिरीत पडून मोठा अपघात झाला होता या अपघातात शंकर सावखेडा यांच्या दोन्ही पायाचे ऑपरेशन करायचे काम पडले त्याही वेळी कोणत्याही प्रकारची प्रशासनाची मदत मिळाली नाही यामधून कसेबसे सावरत आपल्या संसाराचा गाडा पुढे नेत बँकेचे कर्ज काढून शंकर सावके यांनी आपल्या शेतात पेरणी केली होता होता नव्हता पैसा शेतीला लावला दवाखान्यासाठी झालेले कर्ज फेडता येईल व आपला प्रपंच घरसंसार पुन्हा उभा करता येईल या हेतूने शेतात पेरणी केली होती निसर्गाने पुन्हा घाला घातला आणि संपूर्ण शेतात अडाण नदीचे पाणी घुसून दोन दिवसापूर्वी दि 7, 8 ,2022 रोजी मोठे नुकसान झाले प्रशासनाची यातही कुठल्याही प्रकारची अद्याप पर्यंत मदत मिळाली नाही . तिसऱ्यांदा पुन्हा निसर्गाने शंकर सावके यांच्यावर घाला घातला 9/8/2022 रोजी मोठे संकट कोसळले यामध्ये मध्यरात्री अचानक शॉक सर्किटने आग लागुन दोन बैल, ऐक गोरा , एक गाय, व शेती उपयोगी अवजारे व संपुर्ण कोठा जळुन खाक झाले. प्रशासनाच्या अधिकाऱ्याने अहवाल तर सादर केला मात्र पुढे काय शंकर सावके यांना वाशिम जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मदत करतील का मुख्यमंत्री साहेब शंकर सावके यांच्या कुटुंबावर झालेल्या अपघाताच्या माध्यमातून मदत घेऊन आपलेही पाय यांच्या दाराला लागू द्या म्हणजे प्रशासनांना आणि शासनाला शंकर सावके यांचे सांत्वन तरी करता येईल आदरणीय मायबाप साहेब अध्यापपर्यंत यांच्या पाहणी साठी जिल्ह्यातील मोठे अधिकारी आलेच नाही.

Previous articleमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हर घर तिरंगा’ या अभियानात नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन…
Next articleपालीवाल समाजाचे रक्षाबंधन हे मानवता एकता दिवसाने साजरे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here