Home गडचिरोली दुचाकीवरचे नियंत्रण सुटून टिप्परच्या खाली आल्याने एक जण ठार तर एक जण...

दुचाकीवरचे नियंत्रण सुटून टिप्परच्या खाली आल्याने एक जण ठार तर एक जण जखमी।

62
0

आशाताई बच्छाव

IMG-20220531-WA0036.jpg

दुचाकीवरचे नियंत्रण सुटून टिप्परच्या खाली आल्याने एक जण ठार तर एक जण जखमी।

अड्याळमध्ये घडला भीषण अपघात

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
चामोर्शी तालुक्यातील अड्याळ येथे दुचाकीस्वारांचे नियंत्रण सुटल्याने विरुद्ध दिशेने येणाऱ्या टिप्परच्या मागच्या चाकात येऊन दुचाकीच्या मागे बसलेला 20 वर्षीय युवक जागीच ठार झाला तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना दिनांक 31 मे मंगळवारी सकाळी नऊ वाजताच्या सुमारास घडली.

रोहित कालिदास मडावी वय 20 वर्ष रा येणापूर ता चामोर्शी जि गडचिरोली असे अपघातात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. नाव आहे.तर जखमी दुचाकीस्वार बालाजी सातलवार आहे.

सविस्तर वृत्त असे की, चामोर्शी कडून आष्टीकडे गिट्टी भरून जाणारा ट्रक क्रमांक MH 40 Y 1495 जात होता तर विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकी क्रमांक MH 34P P 4828 च्या दुचाकी स्वाराचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने अड्याळ बसस्थानकाजवळ टिप्परच्या मागच्या चाकात दुचाकी आली व यात ट्रकचे मागचे चाक अंगावरून गेल्याने दुचाकीवरील मागे बसलेला युवक जागीच ठार झाला असून यात त्याच्या शरीराचा चेंदामेंदा झाला आहे.तर दुचाकी स्वार हा जखमी झाला असून तो येणापूर येथील रुग्णालयात उपचार घेत आहे.

घटनेची माहिती कळताच आष्टी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून टिप्परच्या चालकाला अटक केली आहे.मृतकाच्या मृतदेहाच्या शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय आष्टी येथे उत्तरीय तपासणीसाठी आणला असून घटनेचा पुढील तपास आष्टी पोलीस करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here