Home गडचिरोली प्रधानमंत्री गरीब कल्याण संमेलन शिमला येथील प्रसारीत राष्ट्रीय परीसंवाद कृषी विज्ञान केंद्र,...

प्रधानमंत्री गरीब कल्याण संमेलन शिमला येथील प्रसारीत राष्ट्रीय परीसंवाद कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर गडचिरोली येथे आयोजित…… खा.अशोकजी नेते

84
0

आशाताई बच्छाव

IMG-20220531-WA0037.jpg

प्रधानमंत्री गरीब कल्याण संमेलन शिमला येथील प्रसारीत राष्ट्रीय परीसंवाद कृषी विज्ञान केंद्र, सोनापूर गडचिरोली येथे आयोजित……
खा.अशोकजी नेते

आंबा महोत्सव उद्घाटन तसेच केंद्र शासनाच्या संपूर्ण योजना संबंधी माहिती…..
खा.अशोकजी नेते

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
कृषी विज्ञान केंद्र सोनापूर गडचिरोली येथे आंबा महोत्सवाचे उद्घाटन करून गरीब कल्याण संमेलनाप्रसंगी बोलतांना खा.अशोकजी नेते.
केंद्रसरकारच्या आठ वर्षात यशस्वी कार्यकालात लोकहिताचे, जनहिताचे, जनकल्याणाचे, निर्णय घेऊन देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी युद्धपातळीवर कामे करीत आहे. सामान्य विविध घटकातील लोकांना न्याय व विविध योजनांचा लाभ मिळायला पाहिजे.असे प्रतिपादन मान.खा.अशोकजी नेते यांनी केले.
भारताच्या 75 व्या स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशातील कोणताही नागरिक विकासापासून वंचित राहू नये व त्याचा विविध गरजा सर्वसमावेशक आणि एकत्रितपणे पूर्ण होण्यासाठी शासनाने लाभार्थांवर लक्ष केंद्रित केले आहे.
केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री विविध योजना संबंधी माहिती देण्यात आली.जसे किसान सम्मान निधि, आयुष्यमान भारत, मुद्रा लोन योजना, आवास योजना, जल जीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन,उज्वला गॅस योजना, जनधन योजना,गरीब कल्याण अन्न योजना,एक राष्ट्र एक राशन, अशा अनेक प्रधानमंत्री कल्याणकारक योजना आहेत.
तसेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा( अकरा) 11 हप्ता सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केला जाईल.
याप्रसंगी मा.डॉ.कदम पशूविज्ञान विशेषज्ञ, जिजामाता, कृषी पुरस्कृत श्रीमती प्रतिभा चौधरी, प्रा.डॉ.निलिमा पाटील, डॉ.पुष्पक बोथीकर,डॉ.सुचित लाकडे, प्रा.ज्ञानेश्वर ताथोड, प्रशासकीय अधिकारी, शेतकरीवर्ग तसेच अनेक योजनांचे लाभार्थी नागरिक उपस्थित होते.

Previous articleगरोदर महिलांना गाव पातळीवरच रक्ताची सोय करण्यासाठी युवकांचे हात सरसावले
Next articleदुचाकीवरचे नियंत्रण सुटून टिप्परच्या खाली आल्याने एक जण ठार तर एक जण जखमी।
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here