आशाताई बच्छाव
नीती आयोगाच्या बैठकीच्या छायाचित्रात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना शेवटच्या रांगेत स्थान ,विरोधकांकडून टीका रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी सध्या चांगलीच चर्चेत असते. कधी मंत्रिमंडळ विस्तारामुळे, कधी आरक्षणासाठीच्या दौऱ्यांमुळे तर कधी दिल्ली दरबारी पंतप्रधानांची भेट न झाल्यामुळे.आता, निती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांना मिळालेल्या मान-सन्मानामुळे त्यांची दिल्लीवारी चर्चेत असून त्यांचा फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह दिग्गज नेते, केंद्रीयमंत्री आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री दिसून येत आहेत. मात्र, या रांगेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सर्वात शेवटच्या रांगेत असल्याने अनेकांकडून टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादीचे नेते आमदार अमोल मिटकरी यांनीही हा फोटो ट्विट करुन, हे पाहून वाईट वाटल्याचं म्हटलं आहे.एकनाथ शिंदे साहेब मोठे नेते आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन असलेल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. तरीही त्यांना शेवटच्या रांगेत स्थान देणं योग्य नाही. प्रत्येक मराठी मनाला यामुळं नक्कीच दुःख झालंय. यापुढं असं होणार नाही, याची दक्षता केंद्र सरकार घेईल, अशी अपेक्षा करूयात!” असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.