आशाताई बच्छाव
भाजप खा. हिना गावित यांच्या गाडीचा अपघात:नाकाचे हाड फ्रॅक्चर उपचारांसाठी नंदुरबारहून मुंबईला रवाना. प्रतिनिधी – सागर कांदळकर . नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या भाजप खासदार डॉ. हिना गावित यांच्या गाडीचा आज अपघात झाला. अपघातात खासदार किरकोळ जखमी झाल्या आहेत. अपघातात त्यांच्या कारमधील चार जण व दोन दुचाकीस्वार असे सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. मुंबईत खासगी रुग्णालयात उपचार
खासदार हिना गावित यांचा अपघात झाल्यानंतर त्यांना तातडीने नंदुरबार शहरातील तुलसी हॉस्पिटल येथे नेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुढील उपचासाठी डॉक्टर हिना गावित यांना मुंबई येथे खाजगी रुग्णालयात नेण्यात येत आहे. पुढील उपचार मुंबई येथे होणार असल्याची माहिती स्वतः हिना गावित यांनी दिली आहे.
दुचाकीस्वारही जखमी
हिना गावित आज नंदुरबार शहरात एका कार्यक्रमासाठी जात होत्या. मात्र, शहरातील गुरव चौक येथे रस्त्यात त्यांच्या वाहनासमोर अचानक दुचाकीस्वार आला. त्यामुळे खासदार हिना गावित यांची गाडी झाडावर आदळली. त्यामध्ये खासदार हिना गावित यांच्या नाकाला दुखापत झाली. गावित यांच्या नाकाचे हाड फ्रॅक्चर झाले असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. दरम्यान, गावित त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते आणि दुचाकीस्वार महिलादेखील जखमी झाले.
सर्वांची प्रकृति स्थिर
गावित त्यांच्यासोबत असलेले कार्यकर्ते सुभाष पाटील यांना पायाला दुखापत झाली आहे. तर महेंद्र पटेल यांच्या देखील हाताला दुखापत झाली आहे. जीतू पाटील, प्रतिक जैन यांना किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र गाडीसमोर आलेल्या दुचाकीवर असलेले महिला आणि पुरुष जखमी झाले आहेत. दुचाकीवर असलेल्या महिलेला दुखापत झाल्याने त्यांना शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यासोबत खासदार गावित आणि कार्यकर्त्यांची देखील प्रकृती स्थिर आहे. मात्र, पुढील उपचारासाठी डॉक्टर हिना गावित रेल्वेने उपचारासाठी मुंबई येथे निघाल्या आहेत.