Home नाशिक देवळा तालुक्यात आमदार डाँ.राहुल आहेरांच्या हस्ते ध्वजांचे वाटप

देवळा तालुक्यात आमदार डाँ.राहुल आहेरांच्या हस्ते ध्वजांचे वाटप

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20220808-WA0032.jpg

(भिला आहेर युवा मराठा न्युज नेटवर्क)
देवळा प्रतिनिधी :- राष्ट्रीय एकात्मता जपण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी एकत्र येणे गरजेचे असून प्रशासनाने जनजागृती करून जनतेतील शेवटच्या नागरिकांपर्यंत अभियानाची माहिती पुरवून अभियान यशस्वी करावे असे प्रतिपादन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले ते देवळा येथील प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आयोजित स्वातंत्र्यदिनाच्या अमृतमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी हर घर तिरंगा अभियानांतर्गत प्रतिनिधीक स्वरूपात तिरंगा ध्वजाचे वाटप आमदार डॉ. आहेर यांच्या हस्ते करण्यात आले.
यात प्रामुख्याने रांगोळी स्पर्धा, स्वच्छता मोहीम, ऐतिहासिक वारसा असलेल्या ठिकाणी एकत्र येऊन स्वच्छता मोहीम राबविणे, आरोग्यविषयक बाबी,महिला मेळावा,बचतगटांना मार्गदर्शन ,बालविवाह यासारख्या गोष्टींवर देखील चर्चा होणार आहे तसेच ११ऑगस्टला भौगोलिक इतिहास उलगडला जाईल ,मोबाईलचे दुष्परिणाम याबाबत मार्गदर्शन, आर्थिक साक्षरता अभियां,शेतकरी मेळावा घेऊन सेंद्रिय शेती या विषयावर मार्गदर्शन ,पर्यावरण संवर्धन शपथ, प्लास्टिक बंदी,वृक्षारोपण,प्रभातफेरी, शालेय स्पर्धा याप्रमाणे दि.९ ते १७ ऑगस्ट दरम्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून १७ तारखेला या सर्व कार्यक्रमाचे समारोप करण्यात येणार असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी सतिश बच्छाव यांनी दिली.यावेळी चांदवड देवळ्याचे प्रांताधिकारी चेंद्रशखर देशमुख, तहसीलदार विजय सूर्यवंशी,गटविकास अधिकारी राजेंद्र देशमुख, पोलीस निरीक्षक दिलीप लांडगे,कृषी अधिकारी सचिन देवरे,नायब तहसिलदार विजय बनसोडे, भाजपा देवळा तालुकाध्यक्ष किशोर चव्हाण तसेच देवळा तालुक्यातील सर्व सरपंच, प्रशासक,ग्रामविकास अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी,सर्व विभागांचे खातेप्रमुख,सर्व विस्तार अधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleयेलदरी, सिध्देश्वर धरणांतून पाणी सोडण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Next articleआजादी का अमृत महोत्सव ग्रामसभेत महापुरुष अवतरले
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here