आशाताई बच्छाव
येलदरी, सिध्देश्वर धरणांतून पाणी सोडण्यात येणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)
परभणी:- येलदरी व सिध्देश्वर
धरणांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने
धरणांच्या पाणी साठ्यात वाढ होत आहे. सोमवार ८ ऑगस्ट रोजी येलदरी धरणात ७४४.०११ दलघमी तर सिध्देश्वर धरणात २४१.४७८ दलघमी पाणीसाठा आहे. एकुण पाणी साठवणुक
क्षमतेच्या येलदरी ७६.४८ तर सिध्देश्वर ८८.४२ टक्के भरले आहे. यामुळे येत्या काळात कोणत्याही क्षणी दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यासाठी धरणाखालच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.
यावर्षी पावसाचे प्रमाण अधिक आहे. विशेषतः धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे येलदरी व सिध्देश्वर धरणे या पावसाळ्यात शंभर टक्के क्षमतेने भरतील. सोमवार ८ ऑगस्ट पर्यंत धरणांमध्ये ७० टक्यांच्या वर पाणी साठा जमा झाला असून येत्या काळात पाण्याची आवक लक्षात घेता पूर्णा
पाटबंधारे विभाग पाण्याचा वेळोवेळी विसर्ग करत आहे. याच अनुषंगाने सोमवारी पूर्णा पाटबंधारे विभागाच्या वतीने जिल्हाप्रशासनाला संभाव्य पाण्याच्या विसर्गासंदर्भात कळवण्यात आले आहे. येलदरी व सिध्देश्वर धरणांतून पाणी सोडण्यात येणार असल्याने नदी काठच्या गावांना सावधानतेचा इशारा द्यावा असे पूर नियंत्रण कक्ष जिल्हाधिकारी कार्यालये यांना कळविले आहे. नागरीकांनी नदीपात्रात उतरूनये, जनावरे नदीत सोडु नयेत किंवा कोणतीही जीवीत हानी अथवा वित्त हानी होणार नाही यासंदर्भात काळजी घ्यावी असे अवाहन कार्यकारी अभियंता पूर्णा पाटबंधारे विभाग, वसमत नगर यांनी केले आहे.






