Home गडचिरोली जगाच्या पोशिंद्याला वाचविण्यासाठी धावले काँग्रेस कमिटी सावली———-

जगाच्या पोशिंद्याला वाचविण्यासाठी धावले काँग्रेस कमिटी सावली———-

29
0

आशाताई बच्छाव

IMG-20220804-WA0011.jpg

जगाच्या पोशिंद्याला वाचविण्यासाठी धावले काँग्रेस कमिटी सावली———————

आसोला मेंढा मुख्य तलावाचे पाणी शेत पिकासाठी लवकरच सोडून जीवनदान द्यावे – तालुका काँग्रेस कमिटी सावली ची मागणी——————–

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

सावली : भारत देश हा कृषी प्रधान देश म्हणुन ओळखल्या जाते. रात्रंदिवस काबाडकष्ट करून शेतकरी अन्नधान्य पिकवतात. भारतातील अर्थ व्यवस्था देखील शेती उद्योगाशी निगडित आहे. भारतीय समाज व्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शेतीवर उद्योगधंदे, पशुधन आणि मानवी जीवन अवलंबून असते. शेतीचे चाके थांबल्यास सर्व जनजीवन उध्वस्त होण्या शिवाय पर्याय नसतो. कारण अन्नधान्य, भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ या सारखे जिवनाश्यक बाबीचा निर्माता हा शेतकरी आहे. समाजव्यवस्था अबाधित रहावी म्हणून उन, पाऊस, थंडी, वादळी वारा अशां आपदांचा कसलाही विचार न करता, न थकता बारामाही राबणारा पोशिंदा म्हणजेच शेतकरी होय. सर्वांना लागणारे अन्नधान्य तो पिकवतो म्हणून त्याला जगाचा पोशिंदा म्हटल्या जाते. त्यामुळे या कृषीप्रधान देशात शेती व शेतकऱ्यांना सन्मानाचा दर्जा दिला जावे.
परंतु मागच्या जुलै महिन्यात पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली आहे. आज जवळ पास सावली तालुक्यातील ७०% रोवणी झालेली आहे. परंतु सध्या परिस्थिती मध्ये पावसाने दडी मारली असून शेतकरी वर्गाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
आज जिल्हाचे माजी पालकमंत्री तथा विद्यमान आमदार श्री विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या मार्गदर्शनाखाली सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री नितिनजी गोहणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारी अभियंता आसोला मेंढा प्रकल्प विभागाला निवेदन देण्यात आले. श्री अ. गा. आठवले सहायक अभियंता यांनी औरंगाबाद ला गेल्यामुळे श्री आकाश मेश्राम वरीष्ठ लिपिक व श्री अनिल कोपुलवार कनिष्ठ लिपिक यांच्याकडे निवेदन देण्यात आले. श्री नितीनजी गोहणे यांनी सहायक अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ५ ऑगस्ट ला पाणी वाटप करण्याबाबत मीटिंग आयोजित केली असून ६ तारखेला पाणी सोडण्याचे आश्वासन दिले. यामुळे शेतकरी वर्गाला दिलासा मिळणार असून बाकी असलेली रोवणी पूर्ण होणार आहे.
यावेळी उपस्थित श्री अनिल म्हशाखेत्री, श्री शरद कनाके, श्री किशोर घोटेकर, श्री चेतन रामटेके, श्री विजय मेश्राम, बहू मेश्राम, श्री सत्यवान दिवटे व काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleवडगाव नगरपरिषदेची ॲम्बुलन्स रामभरोसे.
Next articleजनविरोधी धोरणांविरोधात लाल बावट्याच्या नेतृत्वात जनतेने एकत्र यावे : काॅ. डाॅ.महेश कोपूलवार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here