Home रत्नागिरी विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण जोपासून समृद्ध व्हावे- सौ. नमिता कीर

विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण जोपासून समृद्ध व्हावे- सौ. नमिता कीर

75
0

आशाताई बच्छाव

IMG-20220803-WA0024.jpg

विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण जोपासून समृद्ध व्हावे- सौ. नमिता कीर

रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क) –देव, घैसास, कीर वरिष्ठ महाविद्यालयात मंगळवारी भारत शिक्षण मंडळाच्या कार्याध्यक्षा सौ.नमिता कीर यांच्या हस्ते वाङमय मंडळाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला भारत शिक्षण मंडळाचे माजी कार्याध्यक्ष दिनकर पटवर्धन उपस्थित होते. महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या सौ.मधुरा पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रेयस आग्रे या विद्यार्थ्यांने केले. वैष्णवी बाणे, मनीष नांदगावकर, श्रद्धा आंबरे,भार्गवी मांडवकर या विद्यार्थ्यांनी वाङमय मंडळाची आवश्यकता या विषयावर मनोगते व्यक्त केली.

सौ. कीर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचन करत रहा, कलागुण जोपासा, वाढवा, समृद्ध करा असा मोलाचा सल्ला दिला. ‘गझलगाथा’ हे त्यांचं संपादित पुस्तक त्यांनी वाङमय मंडळाला भेट म्हणून दिले. दिनकर पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

संजीवनी गुरुकुलचे प्रबंधक मनोज जाधव, उपप्राचार्या सौ. वसुंधरा जाधव, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मराठी विभाग प्रमुख अनन्या धुंदूर यांनी केले हिंदी विभाग प्रमुख कस्तुरी मोहित यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here