Home रत्नागिरी खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल

160

आशाताई बच्छाव

IMG-20220803-WA0020.jpg

खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल                                   रत्नागिरी,(सुनील धावडे ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी १ जानेवारी २०२२ ते ३१ डिसेंबर २०२० या मुदतीत शासकीय निधी मधून त्यांच्या वाहनाला ५ लाख १५ हजार ४७९ रुपये ९१ पैसे वापरून इंधन पुरवठा करत शासकीय निधीचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात ३० जुलै रोजी सांयकाळी उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी पालिकेचे विद्यमान मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर यांनी खेड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. खेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष तथा मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी खेड पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप शिवसेनेचे माजी नगरसेवक व गटनेते प्रज्योत तोडकरी यांच्यासह सेनेच्या दहा नगरसेवकांनी केला होता. याबाबत त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे खेडेकर यांच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारी मुद्देसुत लेखी स्वरुपात केल्या होत्या. त्या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी करून खेडेकर यांना इंधन वापरासाठी पालिकेतून केलेल्या खर्चात अनियमितता केल्याबद्दल दोषी ठरवले होते.

Previous articleपिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्ट सर्व्हेअरला घेतले ताब्यात … लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने टाकली धाड
Next articleविद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुण जोपासून समृद्ध व्हावे- सौ. नमिता कीर
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.