Home पुणे पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्ट सर्व्हेअरला घेतले ताब्यात … लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने टाकली...

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्ट सर्व्हेअरला घेतले ताब्यात … लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने टाकली धाड

130

आशाताई बच्छाव

IMG-20220803-WA0035.jpg

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भ्रष्ट सर्व्हेअरला घेतले ताब्यात … लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने टाकली धाड
पिंपरी चिंचवड प्रतिनिधीउमेश पाटील
अवैध व्यवसायाला अटकाव करण्याकरीता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नेहमी कारवाई केली जाते. अशीच कारवाई आज (दि.०३ ऑगस्ट) पिंपरी-चिंचवड महापालिकेतील नगररचना विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात आली. या प्रकरणी एका सर्व्हेअरला ताब्यात घेतले आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिका मुख्यालयात तळमजल्यावर नगररचना विभागाचे कार्यालय आहे. त्याठिकाणी दुपारी पावणे दोनच्या सुमारास एसीबीचे पथक दाखल झाले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एका सर्व्हेअरला ताब्यात घेतले आहे. संदिप लबडे असे लाच मागणाऱ्या सर्व्हेअर चे नाव आहे. त्याची बंद दाराआड चौकशी सुरू असून त्याने एकाकडे दोन लाख रुपयांची लाच मागितली असल्याचे समजते आहे.

Previous articleघरो घरी तिरंगा महोत्सवाअंतर्गत जिल्ह्यामध्ये 4 लाख 80 हजार घरावर तिरंगा ध्वज फडकणार
Next articleखेड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.