Home परभणी घराला कुलूप नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दीड लाखांचे दागिने केले लंपास

घराला कुलूप नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दीड लाखांचे दागिने केले लंपास

67
0

आशाताई बच्छाव

Screenshot_20220726-204836_Google.jpg

घराला कुलूप नसल्याचा फायदा घेत चोरट्यांनी दीड लाखांचे दागिने केले लंपास

शत्रुघ्न काकडे पाटील:-ब्युरो चिफ (युवा मराठा न्युज नेटवर्क परभणी)

(परभणी)जिंतूर :- तालुक्यातील कौसडी येथील बसवेश्वर नगरमधील घराला कुलूप नसल्याचा फायदा घेत चोरट्याने भर दिवसा दीड लाख रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवार, दि. २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजता घडली. याविषयी सविस्तर माहिती अशी की, कौसडी येथील बसवेश्वर नगर येथील रहिवासी लक्ष्मणराव गणपतराव जीवने यांच्या घरातील पुरुष व्यक्ती कामानिमित्त बाहेर गेले होते घरातील महिला घराच्या दरवाज्याला कोंडा लावून गावाजवळील मंदिरात दर्शनाला गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने दरवाजाचा कोंडा उघडून घरात प्रवेश केला घरातील कपाटाला लॉक न लावल्याने कपाट उघडून कपाटातील तिजोरी व ड्रॉवरचे कुलूप तोडून सोन्याच्या दोन अंगठ्या, झुंबर, सेवन पीस, कानातले झुमके असे अंदाजे दीड लाख रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केला. गावातील मंदिरातून देवदर्शन करून जीवने यांची दोन मुले घरी आल्यावर घराचा दरवाजा व कपाट उघडे असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी घरात येऊन पाहिले असता कपाट उघडे असल्याचे त्यातील सामान अस्थाव्यस्थ पडलेले दिसून आले.
घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ या घटनेची माहिती बोरी पोलीस ठाण्यात दिली. चोरीच्या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस निरीक्षक वसंत मुळे सहका-यांसह घटनास्थळी आले. परभणी येथील ठसे पथकालाही बोलावण्यात आले होते. या घटनेमुळे गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीचा तपास लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर निर्माण झाले आहे. त्यामुळे बोरी पोलिसांच्या कारवाईकडे आता सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Previous articleनागभीड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे मा.सोनियाजी गांधी यांच्या समर्थनात शांततापूर्ण सत्याग्रह
Next articleअंधश्रध्देचे झाड;विद्यार्थीनाचा अवमान! नाशिक येथील घटना!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here