Home गडचिरोली सिरोंचा पूरग्रस्त परिसरातील विद्यार्थ्यांना डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूरच्या वतीने भोजन...

सिरोंचा पूरग्रस्त परिसरातील विद्यार्थ्यांना डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूरच्या वतीने भोजन किटचे वितरण

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220717-WA0029.jpg

सिरोंचा पूरग्रस्त परिसरातील विद्यार्थ्यांना डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूरच्या वतीने भोजन किटचे वितरण पूरग्रस्त परिसरातही सुरू आहे सेवाकार्य गडचिरोली ला राहणाऱ्या मात्र पूर परिस्थितीमुळे मागील दहा दिवसांपासून घराचा संपर्क तुटल्याने अडचणीत आलेल्या विद्यार्थ्यांना मदत

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

गडचिरोली येथे पोलीस भरती करिता आलेल्या सिरोंचा परिसरातील नरसिंहापल्ली, मुकडीगुट्टा, मंडलापूर , सिरोंचा, बोरामपल्ली , येल्ला, कमलापुर या गावातील विद्यार्थ्यांना मागील १०-१२ दिवसांपासून आपल्या गावाचा ,परिवाराचा संपर्क होत नसल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांची अडचण लक्षात घेऊन डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीच्या वतीने गडचिरोली येथे भोजन किटचे वितरण करण्यात आले.

डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूरच्या वतीने समितीचे अध्यक्ष वसंतरावजी थोटे, सचिव अधिवक्ता आशिषजी धर्मपूरीवार ,यांच्या मदतीच्या आवाहनाला प्रतिसाद देत गडचिरोली येथे गरजू विद्यार्थ्यांना भोजन किटचे वितरण करण्यात आले.

यावेळी संघाचे विभाग सहकार्यवाह सुभाषजी ईटनकर सेवा विभागाचे प्रचारक प्रशांतजी कावरे, डॉ. हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीचे सदस्य दिलीप मस्के, जिल्हा प्रचारक पवनजी डहारे, नगर कार्यवाह सौरभ पुण्यपरेड्डीवार संघ विस्तारक चेतन भांडेकर यांच्या हस्ते भोजन किटचे वितरण करण्यात आले.

डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समितीच्या वतीने सिरोंचा परिसरातही मदतकार्य ,सेवा कार्य सुरू असून भोजन कीट कपडे , जीवनावश्यक वस्तूंचे वितरण अशा विविध मार्गाने मदतीचे सेवा कार्य सुरू आहे.

मागील काही दिवसांपासून संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे . परिणामी रस्ते मार्ग बंद असल्याने अनेकांना आपल्या गावाकडून येणारी मदत थांबलेली आहे गावातील कोणत्याही लोकांची व परिवारातील सदस्यांची संपर्क राहिलेला नाही. गडचिरोली येथे पोलीस दलाच्या शारीरिक चाचणी करिता तयारी करीत असलेल्या सिरोंच्या परिसरातील विध्यार्थी अडचणीत आल्याची बाब डॉ हेडगेवार सेवा समितीच्या निदर्शनास आली. त्यामुळे या विद्यार्थ्यांना लगेच भोजन कीटची व्यवस्था करुन देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here