Home नांदेड नरसी येथे कंटेनरच्या धडकेत एक जण ठार.

नरसी येथे कंटेनरच्या धडकेत एक जण ठार.

57
0

आशाताई बच्छाव

IMG-20220714-WA0040.jpg

नरसी येथे कंटेनरच्या धडकेत एक जण ठार.

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
रामतीर्थ पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नरसी येथे कंटे नरने धडक दिल्याने एक जण ठार झाल्याची घटना दि.१४ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास नायगाव तालुक्यातील नरसी येथे घडली असून आयचर कंटेनर चालकाविरुद्ध रामतीर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सुञाकडुन मिळालेली माहीती अशी की मालवाहतूक आयचर कंटेनर क्र.आर.जे.०२ .जी.बी. ०१०७ ही कंटेनर दि.१४ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगाने देगलुर कडून नरसीकडे येत असताना नरसी -देगलुर रोडवर असलेल्या चामुंडा हाॅटेल जवळ हा अपघात झाला आहे

नरसी येथील सदरच्या हॉटेल येथे फराळ पाणी करून बाहेर रोडच्या बाजूला उभा असलेल्या मयत भुमा गणपती गायकवाड वय ५० वर्ष राहणार बेळकोणी बु.तालुका बिलोली यांना जोराची धडक दिल्याने सदरच्या तरुणांनाच्या डोक्याला जब्बर मार लागल्याने तो गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत असलेल्या तरुणास नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले येथील डाॅक्टरनी जखमी भुमा गणपती गायकवाड यांचा मृत्यु झाल्याचे सांगितले आहे

यात कंटेनर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने व निष्काळजी पणामुळे मजुरांला धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाला मयत भुमा गणपती गायकवाड यांचे नायगाव येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करून बेळकोणी ता.बिलोली येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले रामतीर्थ पोलीस ठाण्यात सदरचा कंटेनर क्रमांक .आर.जे.०२.जी.बी.०१०७ या चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती ठाण्याचे सपोनि पल्लेवाड यांच्या मार्गदर्शखाली फौजदार शेख लतीफ यांनी माहिती दिली व पुढील तपास सपोनि पल्लेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शेख लतिफ हे करीत आहेत

Previous articleजीर्ण तसेच धोकादायक इमारती मालकांना नगर परिषद, गडचिरेाली यांचे सूचना
Next articleसरपंचांचा ग्रामपंचायत कार्यालयातच वाढदिवस साजरा करून गावात केले वृक्षारोपण
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here