आशाताई बच्छाव
हनुमान नगर महिला मंडऴा, तफै अंजुम ताई कांदे यांचा भव्य सत्कार नांदगाव:-प्रतिनीधी अनिल धामणे पॅरिसा कम्युनिकेशन आयोजित डिजेल्स इव्हेण्ट मिस व मिसेस सौंदर्यवती स्पर्धेत दिल्ली येथे झालेल्या ग्रँड फिनालेत देशभरातील विविध स्पर्धकांमध्ये मिसेस इंडिया वर्ल्ड 2022 पुरस्काराने आमदार सुहास कांदे यांच्या धर्मपत्नी सौ अंजूमताई सुहास कांदे याना सन्मानित करण्यात आल्याबद्दल येथील हनुमाननगर येथील महिला मंडळाच्या वतीने सौ कांदे यांचा सत्कार करण्यात आला सौ कांदे यांना मिळालेल्या पुरस्काराने नांदगावच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.यामूळे सबंध तालुक्यात आनदाचे वातावरण पसरले. सौ कांदे या हनुमाननगरच्या रहिवाशी असून आ.सुहासआण्णा कांदे यांचेबरोबरीने विकासकामाबरोबर समाजकार्यातही आघाडीवर असतात .त्यांचा साधेपणा वसहज आपलस करण्याची वृत्ती महीलांनी आनुभवण्यास मिळाली.त्यांना मिळालेल्या सन्मानाने आपल्या सर्वांचाच हा गौरव असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकरत्या सौज्योत्स्ना निकम यांनी या सत्कारप्रसंगी व्यक्त केली हनुमाननगर येथील महिला मंडळाच्या वतीने सौ अंजुम कांदे यांचा यथोचित सत्कार केला यावेळी,मोरझर च्या, सरपंच लिंना पाटिल ,काॅग्रेस महिला शहर अध्यक्षा,रुपाली पाटील, सामाजिक कार्यकर्ता मनिषा आहेर,,निता शिंदे,मिना पवार,मिना निकम ,प्रमिला आहेर,शितल पाटील,वृषाली पाटील,आशा दराडे इत्यादी भगिनी उपस्थित होत्या.