Home नांदेड जिल्हा कारागृहातील बंदीजणांसाठी विशेष तपासणी शिबिर · 33 महिला बंदीजणांची झाली तपासणी

जिल्हा कारागृहातील बंदीजणांसाठी विशेष तपासणी शिबिर · 33 महिला बंदीजणांची झाली तपासणी

46
0

आशाताई बच्छाव

IMG-20220708-WA0022.jpg

जिल्हा कारागृहातील बंदीजणांसाठी विशेष तपासणी शिबिर

· 33 महिला बंदीजणांची झाली तपासणी
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड  :- जिल्हा कारागृहात असलेल्या बंदीजणांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घेण्यासह कुणाला जर गंभीर आजार असेल तर त्याचे लवकर निदान करता यावे या उद्देशाने आज जिल्हा कारागृहात विशेष आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन.आय. भोसीकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिरासाठी नेमण्यात आलेल्या पथकाकडून एनसीडी वैद्यकीय अधिकारी यांच्यामार्फत उच्चरक्तदाब, मधुमेह, एचआयव्ही इत्यादीची तपासणी करण्यात आली. या शिबिरात उच्चरक्तदाब व मधुमेहाचे निदान झालेल्या बंदीजणांवर त्वरीत औषधोपचार सुरु करण्यात आले.

संपूर्ण कैद्यांची जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय पथकामार्फत नियमित तपासणी केली जाते. याचबरोबर दररोज वैद्यकीय अधिकारी कैद्यांच्या आरोग्यासाठी उपलब्ध असतात. कोरोनाच्या विविध मर्यादानंतर आता एकत्रित आरोग्य तपासणी शिबिर सुरु करण्यात येत असल्याची माहिती कारागृह अधिक्षक एस.एम. सोनवणे यांनी दिली.

या आरोग्य शिबिरात एनसीडी वैद्यकीय अधिकारी डॉ. विखारुनिसा खान, भूलतज्ञ डॉ. सोनाली जाधव, समुपदेशक सुवर्णकार सदाशिव, प्रयोगशाळा तंत्रज्ञ संतोष बेटकर, अधिपरिचारिका प्रियंका झगडे, एसटीडी समुपदेशक उषा वानखेडे यांनी बंदीजणांची आरोग्य तपासणी केली. यावेळी तुरुंगाधिकारी तुकमे, औषध निर्माण अधिकारी आर. के. देवकत्ते, महिला रक्षक टेकुळे व ताई बिनवडे यांनी सहकार्य केले.

Previous articleपंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न · मेळाव्यात 191 उमेदवारांची प्राथमिक निवड
Next article“हर घर तिरंगा” साठी जिल्ह्यातील 5 लाख नागरिकांचा मिळेल उत्स्फूर्त सहभाग – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here