Home नांदेड पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न · मेळाव्यात 191 उमेदवारांची प्राथमिक निवड

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न · मेळाव्यात 191 उमेदवारांची प्राथमिक निवड

37
0

आशाताई बच्छाव

IMG-20220708-WA0024.jpg

पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न

· मेळाव्यात 191 उमेदवारांची प्राथमिक निवड
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड  :- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व श्री हजुर साहिब औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने श्री हजुर साहिब औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी पंडीत दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा नुकताच संपन्न झाला. या मेळाव्यात 9 नामांकित कंपन्यानी सहभाग नोंदवला. या मेळाव्यात एकूण 310 उमेदवार उपस्थित होते. नऊ कंपन्यांनी उमेदवारांची मुलाखती घेऊन 191 विद्यार्थ्यांची प्राथमिक निवड केली.

 

या मेळाव्यास श्री गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे अधिक्षक श्री गुरुविंदरसिंग वाधवा, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य बिराजदार, भोकर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य श्री पाटणुरकर, गुरुद्दारा सचंखड बोर्डाचे सहायक अधीक्षक रवींद्रसिंग कपुर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्राच्या अध्यक्षा श्रीमती सुजाता पोहरे, सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार, प्राचार्य गुरबचन सिंग शिलेदार यांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुविंदरसिंग वाधवा यांनी युवकांना स्वत:चे कौशल्य ओळखून जीवनातील समस्यांना कशाप्रकारे सामोरे गेले पाहिजे याविषयी मार्गदर्शन करुन विद्यार्थ्यांना मुलाखतीसाठी शुभेच्छा दिल्या. प्राचार्य बिराजदार यांनी विद्यार्थ्यांना कामाशिवाय या जगात कुणीही महत्व देत नाही या विषयावर मार्गदर्शन केले. श्री पाटणुरकर यांनी मराठवाडयातील मुलांची मानसिकता कशी असते व त्यांना या स्पर्धेच्या जगात स्वत:ला सिध्द केले पाहिजे असे सांगितले. सहायक आयुक्त श्रीमती रेणुका तम्मलवार यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीच्या वेळी वर्तन कसे असावे याबाबत मार्गदर्शन करुन मार्गदर्शन केंद्रातील योजनांची माहिती दिली. श्रीमती सुजाता पोहरे यांनी विद्यार्थ्यांना आपले कर्तृत्व कसे सिध्द करावे याबाबत मार्गदर्शन केले.

Previous articleगावनिहाय सूक्ष्म कृती आराखड्यावर भर द्या – पालक सचिव एकनाथ डवले
Next articleजिल्हा कारागृहातील बंदीजणांसाठी विशेष तपासणी शिबिर · 33 महिला बंदीजणांची झाली तपासणी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here