Home बुलढाणा चतुर्थ वर्षातील कृषिदूत व ग्रामपंचायत पळशी झाशी यांच्या संयुक्तमाध्यमातून कृषी मेळाव्याचे आयोजन!

चतुर्थ वर्षातील कृषिदूत व ग्रामपंचायत पळशी झाशी यांच्या संयुक्तमाध्यमातून कृषी मेळाव्याचे आयोजन!

52
0

आशाताई बच्छाव

IMG-20220618-WA0063.jpg

चतुर्थ वर्षातील कृषिदूत व ग्रामपंचायत पळशी झाशी यांच्या संयुक्तमाध्यमातून कृषी मेळाव्याचे आयोजन!

ज्ञानेश्वर पाटील दांदळे युवा मराठा न्यूज तालुका विशेष प्रतिनिधी

संग्रामपुर:– सातपुडा शिक्षण संस्था संलग्नीत स्वा. गणपतराव इंगळे कृषी व उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव जामोद येथील चतुर्थ वर्षातील कृषीदूत व ग्रामपंचायत पळशी झाशी यांच्या संयुक्त माध्यमातून संग्रामपुर तालुक्यातील पळसी झाशी ग्राममध्ये दि. 14/06/2022 रोजी कृषी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.सदर मेळाव्यात उद्घाटन प्रसंगी सरपंच श्री. अभयसिंह मारोडे, प्रगतशील शेतकरी श्री, गुलबराव मारोडे, प्रताप मारोडे, कृषी विद्यान केंद्र जळगाव जामोद चे शात्रज्ञ श्री.शशांक दाते श्री नितीन तळोकर, तसेच कार्यक्रम अधिकारी श्री. अविनाश आटोळे ई. मान्यवर हजर होते.आजच्या आधुनिक युगात शेतकऱ्यांनी कश्या प्रकारे नवीन तंत्रज्ञानाचा व सरकारी योजनांचा फायदा घेऊन आपल्या उत्पन्नात भर पाडावी याचे विश्लेषण देण्यात आले. सोबतच नवीन प्रकारे उद्भवणारे पिकांवरचे आजार कसे आकात्मिक रित्या रोखल्या जाऊन उत्पादन खर्चात कपात करता येईल हे ही कृषी विद्यान केंद्र जळगाव जामोद च्या अधिकाऱ्यांकडून स्पष्ट करण्यात आले. बदलत्या युगात उत्पादनात भर पडणे आवश्यक झाले आहे, यासाठी BBF म्हणजेच ब्रॉड बेड फरो काय आहे? यामध्ये आपला उत्पादन खर्च कमी होऊन किती फायदा होऊ शकतो याचे सरल सोप्या भाषेत स्पष्टीकरण देण्यात आले.सदर मेळाव्यात श्री. प्रताप मारोडे, गुणवंत मारोडे, कृषी व उद्यानविद्या महाविद्यालय जळगाव जामोद च्या अंतिम वर्षातील विद्यार्थी व गावकरी मंडळीचे मेळावा आयोजित करण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी सहकार्य लाभले.

Previous articleबामणी पोलिसांची धडक कारवाई देशी दारू च्या 154 बाटल्या ताब्यात
Next articleप्रणिता शिंदे केंद्रात प्रथम तर प्रणव एमेकर द्वितीय.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here