Home नाशिक १८ जुनला जलजीवन योजनेचे देवळा तालुक्यात भुमिपुजन केंद्रिय आरोग्यमंत्री डाँ.भारती पवार यांचे...

१८ जुनला जलजीवन योजनेचे देवळा तालुक्यात भुमिपुजन केंद्रिय आरोग्यमंत्री डाँ.भारती पवार यांचे हस्ते पार पडणार

39
0

आशाताई बच्छाव

IMG-20220616-WA0003.jpg

(भिला आहेर तालुका प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
देवळा प्रतिनिधी:- देवळा तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ४५ (पंचेचाळीस) कोटी रुपयांच्या पाणी योजनांच्या कामांचे भूमिपूजन शनिवार दि.१८ जून रोजी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारतीताई पवार यांच्या हस्ते ,चांदवड- देवळा मतदार संघाचे आमदार डॉ. राहुल आहेर यांच्या उपस्थितीत व भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली होणार असल्याची माहिती भाजपा तालुकाध्यक्ष किशोर आहेर यांनी पत्रकार परिषदेत दिली. देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात जिल्हाध्यक्ष केदानाना आहेर यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद झाली.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र शासनाचा यशस्वी आठ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्याने त्यांनी देशाच्या हिताचे व ऐतिहासिक निर्णय घेतले असून नवभरताच्या दिशेने वाटचाल सुरू आहे भाजपाची विचारधारा व अत्योदयाचा संकल्प देत देशातील गोरगरीब ,शोषित,वंचित वर्गाच्या कल्याणासाठी देशसेवेचे ध्येय साध्य करीत आहेत त्या पार्श्वभूमीवर आठ साल सेवा,सुशासन व गरीब कल्याण या कार्यक्रमाचे आयोजन देखील यावेळी करण्यात येत आहे यात प्रामुख्याने किसान सन्मान योजना,उज्ज्वला गॅस योजना,मुद्रालोन योजना,पंतप्रधान पीकविमा योजना आदींचे मार्गदर्शन व लाभार्थ्यांना सन्मान सोहळा यावेळी करण्यात येणार असून .तसेच देवळा तालुक्यातील जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नवीन तयार होत असलेल्या पाणीपुरवठा योजनांचे भूमिपूजन सोहळा,सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत असणाऱ्या रस्त्यांचे दुरुस्तीचे भूमिपूजन, व देवळा तालुक्यातील सर्व नवनिर्वाचित सोसायटी संचालकांचा सत्कार यावेळी करण्यात येणार असून हा कार्यक्रम देवळा येथील दुर्गामाता मंदिरात होणार असल्याची माहिती किशोर चव्हाण यांनी दिली आहे.

Previous articleअग्निवीर’ लष्कर भरतीत विद्यार्थ्यांना मिळेल प्राधान्य           
Next articleजिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने बाबुरावजी मडावी यांना अभिवादन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here