Home बुलढाणा जनता त्रस्त; तहसिल कार्यलय या चा कार्यभार मात्र मस्त

जनता त्रस्त; तहसिल कार्यलय या चा कार्यभार मात्र मस्त

67
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220531-WA0019.jpg

जनता त्रस्त; तहसिल कार्यलय या चा कार्यभार मात्र मस्त
ब्यूरो चिफ स्वप्निल देशमूख सह संग्रामपुर तालुका-विशेष प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील दांदळे
संग्रामपूर :- तलाठी , मंडळ अधिकारी तहसीलदार पैसे घेतल्याशिवाय कामे करत नाहीत रयतक्रांतीचे जिल्हाअध्यक्ष नाना पाटील यांचा आरोप
ग्रामीण भागात प्रशासनाचा मुख्य कणा असलेला महसूल विभागाच्या योजनांची अंमलबजावणी तसेच शेत जमिनीशी संबंधित विविध नोंदी करणे, शेतकरी व विद्यार्थ्यांना लागणारी विविध प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असलेला तलाठी मंडळअधिकारी , विशेष म्हणजे तालुक्याची सर्वेसर्वा असणारे तहसीलदार सिद्धेश्वर वरणगावकर यांच्यासह सर्व महसूल विभाग मस्त असून, जनता मात्र तलाठ्याच्या भेटीसाठी त्रस्त झाली . शिवाय खरीप हंगामासही सुरूवात झाल्याने शेतकऱ्यांना सातबारा, होल्डींग, नमुना नं. ८ आदी कागदपत्रे लागतात. या कागदपत्रांसाठी तलाठी गावात येत नसल्याने ग्रामस्थांची मोठी अडचण होते . या तलाठ्यांवर मंडळ अधिकारी, तहसीलदार, उपविभागीय अधिकारी ना जिल्हाधिकारी, कोणाचेही नियंत्रण नसल्याचे पहावयास मिळते बहुतांश तलाठी हे मुख्यालयी न राहता शहराच्या ठिकाणी राहून कारभार करीत असल्याचे दिसून
आले. तलाठ्यांचा कारभार त्यांच्या अनधिकृत सहाय्यकावरच अवलंबून असल्याचे निदर्शनास आले. तालुक्यात शेतकऱ्यांचे होत असलेली पिळवणूक तलाठी मंडळ अधिकारी व तहसीलदार यांच्या मनमानी कारभाराची व हे पैसे घेतल्याशिवाय काम करत नसल्याबाबत ची तक्रार रयत क्रांती चे जिल्हाध्यक्ष नाना पाटील यांनी भ्रमणध्वनीद्वारे उपविभागीय अधिकारी देवकर मॅडम यांच्याकडे केली असून संग्रामपुर तालुका कडे वरिष्ठ अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे सदरच्या समस्या उद्भवत असल्याची खंत व्यक्त केली.
संग्रामपूर तालुक्यातील महसूल विभागाची कोणी चौकशी करून दोषींवर कारवाई होणार की..? पाणी कुठे मुरणारतर नाही ना..

Previous articleग्रामीण भागात लग्न करणे सोपे मात्र विवाह प्रमाणपत्र मिळणे अवघड
Next articleभाजपा महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते पदी अँड. शिवानंद हैबतपुरे यांची निवडीबद्दल नायगावात कार्यकर्त्याकडून जल्लोष.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here