Home वाशिम महाराष्ट्र पेंच्याक सिलाट असोसिएशनच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील जनार्दन स्वामी आश्रमात राज्यस्तरीय प्रशिक्षण...

महाराष्ट्र पेंच्याक सिलाट असोसिएशनच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील जनार्दन स्वामी आश्रमात राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर

88
0

आशाताई बच्छाव

IMG-20220602-WA0034.jpg

महाराष्ट्र पेंच्याक सिलाट असोसिएशनच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील जनार्दन स्वामी आश्रमात राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर                               वाशिम,(रितेश गाडेकर प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

महाराष्ट्र पेंच्याक सिलाट असोसिएशनच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील जनार्दन स्वामी आश्रमात राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबीर आणि असोसिएशन कप चे आयोजन दिनांक 28 मे पासून 31 मे पर्यंत करण्यात आले होते. अशी महिती वाशिम जिल्हा पेंच्याक सिलाट असोसिएशन चे सचिव प्रसाद मांडवगडे यांनी दिली.या राज्यस्तरीय प्रशिक्षण शिबिराचे उदघाटन दिनांक 28 मे रोजी दुपारी 1 वाजता तर बक्षीस वितरण सोहळा आणि समारोपीय कार्यक्रम दिनांक 31 मे रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न झाला.यामध्ये महाराष्ट्रातील 22 जिल्ह्यातील 180 खेळाडूंना अंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांमार्फत प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये वाशिम जिल्याचे सचिव प्रसाद मांडवगडे आणि खेळाडू सूरज घटमाल यांनी रेफ्री आणि प्रशिक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण करून वाशिम जिल्याचे नाव रोशन केले.तसेच दोघांनी सुद्धा टँडिंग (फाईट) प्रकारात अनुक्रमे रौप्य आणि कास्य पदक वाशिम जिल्ह्याला मिळवून दिले.पेंच्याक सिलाट हा इंडोनेशियन मार्शल आर्ट चा प्रकार असून , टँडिंग (फाईट) तुंगल ( सिंगल काता) रेगु ( ग्रुप काता ), आणि गंडा ( डेमो फाइट ) या चार प्रकारात खेळला जातो. राष्ट्रीय स्तरावर तसेच आशियायी स्पर्धा व अंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी देखील या खेळाला मान्यता आहे.
शालेय पातळीपासून अंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडूंना सरकारी नोकर भरतीमध्ये 5% आरक्षण व अंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक मिळवल्यास 8 लाख रुपयांची पारितोषिके दिली जातात.प्रशिक्षणात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना सकाळी 5 वाजता पासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत प्रशिक्षण, चहा – नाश्ता, जेवण, इत्यादी संघटनेकडून देण्यात आले होते.या शिबिरामध्ये सहभागी झालेले प्रशिक्षक आणि पंच यांना स्पोर्टस अथोरिटी ऑफ इंडिया यांच्या मार्फत प्रमाणपत्र सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.अशी माहिती संस्थेचे महासचिव श्री किशोर येवले सर यांनी दिली.

Previous articleलोहणेर बँकेचे कर्मचारी विठोबा अहिरेंचा सेवानिवृतीनिमित सत्कार संपन्न
Next articleमहाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे 3 जून ला गडचिरोलीत। महिंला विषयक विविध प्रकारचा घेणार आढावा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here