Home नांदेड व्यसन सोडा निरोगी रहा —————————————- जागतिक तंबाखु विरोधी दिन

व्यसन सोडा निरोगी रहा —————————————- जागतिक तंबाखु विरोधी दिन

63
0

आशाताई बच्छाव

IMG-20220530-WA0024.jpg

व्यसन सोडा निरोगी रहा
—————————————-
जागतिक तंबाखु विरोधी दिन
————————————-
मोहसीन खान
अध्यक्ष
अल ईम्रान प्रतिष्ठान,बिलोली
—————————————-

३१ मे हा जागतिक तंबाखु विरोधी दिन साजरा करण्याचा उद्देश हाच कि संपूर्ण जगातील तंबाखूचे सेवन करणा-या लोकांना तंबाखूमुक्त करुन निरोगी बनविण्यासाठी आणि मानवी शरीरावर,अवयवावर होणारे तंबाखुचे दुष्पपरिणाम किती घातक आहे ते टाळण्यासाठी याचा प्रचार प्रसार व्हावा हे सर्व बघुन लोकांनी हे व्यसन सोडावे,व्यसनापासून दुर रहावे.जागतिक आरोग्य संघटनेने १५ मे १९८७ रोजी एक ठराव संमत केला.७ एप्रिल १९८८ हा पहिला जागतिक धुम्रपान विरोधी दिन असावा असे म्हंटले होते.याच दिवशी जागतिक आरोग्य संघटनेचा ४० वा वर्धापन दिन पण होता.तदनंतर १७ मे १९८९ रोजी जागतिक आरोग्य संघटनेने ३१ मे रोजी दरवर्षी जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून ओळखला जावा असा ठराव मंजूर केला.सन १९८९ पासून तंबाखु विरोधी दिन साजरा करण्यात येतो.या दिनाचे महत्त्वाचे उद्देश म्हणजे तंबाखुचा वापर थांबविण्यासाठी जगभरातून प्रयत्न करणे त्याच्या दुष्परिणामाविषयी लोकांमध्ये जाऊन जनजागृती करणे हा आहे.
◼️आज घडीला दर ६ सेकंदाला तंबाखु सेवनामुळे एका व्यक्तीची मृत्यु होते.प्राणघातक असलेल्या प्रमुख ८ आजारापैकी ६ आजार हे तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होते.दरवर्षी जगभरात तंबाखु सेवन केल्यामुळे ८० लाख लोकांच मृत्यु होतो.केवळ धुम्रपानकेल्याने ७० लाख लोक मरण पावतात.व्यसनधिनतेमुळे जवळपास मृत्यु झालेले सर्व व्यक्ती गरीब,कष्टकरी,मोलमजुरी करणा-या कुटूंबातील असून त्यांच्या मृत्युच्या पश्चात त्यांच्यातिल काही कुटूंबे व कुटूंबातील सदस्य आज अंत्यत हालाखीच्या परिस्थित राहत आहे,जिवन जगत आसल्याचे एका सर्वेनुसार निदर्शनास आले आहे.सिगारेट,बिडीसह अन्य तंबाखुजन्य उत्पादने सन २००३ चा कायदा कलम ४ नुसार सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणे गुन्हा आहे.कलम ६ नुसार लहान,अल्पवयीन बालकांना किंवा त्यांच्याकडून तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे.कलम ७ नुसार शैक्षणिक संस्थेच्या १०० मिटर परिसरात तंबाखुजन्य पदार्थाची विक्रीस बंदी आहे.शासन वेळोवेळी कायदे व परिपञक काढत आहे.पण त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.आजच्या आधुनिक युगात तंबाखुसह तंबाखूजन्य पदार्थांच सेवन,धुम्रपान केल्याने त्याचे गंभिर परिणाम शरीरावर व शरीराच्या अवयवावर होतात याची माहिती असताना देखील तंबाखूसेवन करणा-या लोकांचे प्रमाण वरचेवर वाढत चालले आहे.याचा परिणाम सर्वांवर होतो.तंबाखूच्या सेवनाची सुरुवात घरातून,आपल्या सभोवतालच्या परिसरातून,गल्लीतून होते.घरातील कर्ता पुरुष,मोठा माणूसच जर लहान मुलांसमोर व्यसन करत असेल तर घरातील लहान मुले हि मोठी लोक यांच अनुकरण करतात.भविष्यात हिच मुले पुढे व्यसनाच्या नादी लागतात.
◼️ तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाच्या सेवनामुळे मानवी शरीरावर होणारे अल्पकालीन परिणाम हदयाची गती वाढते,रक्तदाब वाढतो,दातावर काळे पांढरे डाग होतात,चव व वास घेण्याची क्षमता कमी होते तर दिर्घकालीन परिणाम पुढील प्रमाणे आहे. तोंड,जिभ,घसा,अन्ननलिका,पोट,आतडी,फुफ्फुस,तीव्र खोकला ,क्षयरोग,दमा,मोतीबिंदू उच्चरक्तदाब,हदयरोग,अर्धांगवायुचा झटका,मधुमेह ,मुञाशय,गर्भ,नपुंसकत्व,वंध्यत्व एकंदरीत ओठापासून ते जठरापर्यंत होऊ शकते.तज्ञ डाॕक्टरांच्या मते तंबाखुच्या धुरात ७००० केमिकल्स असतात.यात निकोटिन,हायड्रोजन सायनाईड,अमोनिया,आर्सेनिक,नेपथॕलिन,कार्बन मोनाक्साईड,कॕडमियम असिटोन डीडीटी,बुटेन,टार हे प्रमुख रसायने आहेत.यापैकी ५० केमिकल्समुळे कर्करोग होऊ शकतो.धुम्रपान करणा-या व्यक्तिंच्या संपर्कात जरी आलात तर हे केमिकल सहजपणे तुमच्या शरीरात प्रवेश करुन जास्त वेळ शरीरात राहतात.सार्वजनिक ठिकाणी तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थांचे सेवन व बिडी,सिगारेट,सिगार चे झुरके मारणा-या तरुण व युवक,वयस्कर मंडळी हे ३०% धुर आपल्या शरीरात घेतात आणि ७०% धुर वातावरणात सोडतात.तो वातावरणात सोडलेला,पसरलेला धुर श्वसनाद्वारे आजूबाजूला असलेल्या लोकांच्या शरीरात जातो.बसस्टॕण्ड,बसमध्ये,हाॕटेल,रेल्वेस्टॕण्ड आदि ठिकाणी सहसा धुम्रपान करणारे महाविद्यालयीन तरुण मिञमंडळा समवेत सहज दिसतात.शासनाने सार्वजनिक ठिकाणी तंबाखु व धुम्रपान बंदीचा निर्णय घेतला.तरीही या कायद्याचे उल्लंघन होत आहे.३१ मे हा दिवस “जागतिक तंबाखु विरोधी दिन” म्हणून पाळला जातो.३१ मे जागतिक तंबाखु विरोधीदिनानिमित्त यावर्षीचा जागतिक आरोग्य संघटनेचा “तंबाखुचा आपल्या पर्यावरणाला धोका” हा मुख्य विषय आहे.म्हणून आज तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थासह ईतर सर्व व्यसन सोडण्याचा,तंबाखु सेवन न करण्याचा निश्चय करा आणि त्याच्यापासून दुर रहा.

Previous articleप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे
Next articleधामनगांव सेवा सोसायटीवर माजी आमदार हानमंतराव पाटील बेटमोरेकर गटाचे वर्चस्व, !
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here