Home नांदेड प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार संलग्न करून...

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे

111

आशाताई बच्छाव

IMG-20220530-WA0027.jpg

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार संलग्न करून घ्यावे
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड, :- प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व नोंदणीकृत लाभार्थ्यांनी त्यांची बँक खाते आधार संलग्न करून सुरळीत लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी केले आहे.

केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत राज्यातील नोंदणीकृत लाभार्थ्यांचे बँक खाते आधार संलग्न करण्याचे निर्देश दिले आहेत. या योजनेअंतर्गत देय लाभ एप्रिल 2022 पासून लाभार्थ्यांच्या आधार संलग्न खात्यात आधार आधारीत अदा करण्याचे प्रस्तावित केले आहे. यासाठी लाभार्थ्यांची पी.एम. किसान योजनेची बँक खाती असलेल्या सर्व बँकांमध्ये सर्व पी. एम. किसान लाभार्थी खातेदारांची बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी मोहिम राबविण्याबाबत नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार व जिल्हा अग्रणी बँक अधिकारी यांना कळविण्यात आले आहे, अशी माहिती तहसिलदार महसूल विजय अवधाने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

Previous articleस्कूल बसचे योग्यता प्रमाणपत्र नुतनीकरण करुन घेण्याचे आवाहन
Next articleव्यसन सोडा निरोगी रहा —————————————- जागतिक तंबाखु विरोधी दिन
Yuva Maratha
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.