Home गडचिरोली गडचिरोलीच्या मेडिकल कॉलेज करिता पद्मश्री डॉ. प्रकाशजी आमटे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करावा

गडचिरोलीच्या मेडिकल कॉलेज करिता पद्मश्री डॉ. प्रकाशजी आमटे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करावा

47
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220526-WA0021.jpg

गडचिरोलीच्या मेडिकल कॉलेज करिता पद्मश्री डॉ. प्रकाशजी आमटे यांनी शासनस्तरावर पाठपुरावा करावा

आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी घेतली आमटे कुटुंबीयांची भेट

लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे भेट घेऊन डॉक्टर अनिकेत आमटे यांना दिले डॉ प्रकाशजी आमटे यांचे पत्र

गडचिरोली,(सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

राज्य शासनाने गडचिरोली जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज रद्द करू नये प्रथमतः मेडिकल कॉलेजचे काम पूर्ण करावे याकरिता आपल्या स्तरावरून शासनाशी पत्रव्यवहार व पाठपुरावा करावा अशी विनंती करणारे पत्र आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसाचे प्रमुख पद्मश्री डॉक्टर प्रकाशजी आमटे यांना दिले

यावेळी प्रकाशजी आमटे केरळच्या प्रवासात असल्याने त्यांच्या वतीने डॉ. अनिकेतजी आमटे यांनी आमदार महोदयांचे पत्र स्वीकारले. यावेळी आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी त्यांच्याशी चर्चा करतांना गडचिरोली जिल्ह्यातील मेडिकल कॉलेज रद्द करून सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याच्या शासनाच्या प्रयत्ना संदर्भात आमटे कुटुंबियांना अवगत केले . प्रथमता जिल्ह्यात मेडिकल कॉलेजची आवश्यकता असून त्यानंतर मोठे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारावे अशी आपली भुमिका असल्याचे स्पष्ट केले

गडचिरोली जिल्ह्यातील गोरगरिबांच्या आरोग्याच्या हिताच्या दृष्टीने प्रथम मेडिकल कॉलेजची आवश्यकता आहे. करिता ती प्रक्रिया शासनाने पूर्ण करावी याकरिता आमटे कुटुंबीयांतर्फे शासनाकडे पत्र व्यवहार व पाठपुरावा व्हावा अशी विनंती त्यांनी या भेटीदरम्यान केली

Previous articleआप ” च्या शहराध्यक्ष पदी कैलाश शर्मा यांची निवड
Next articleरोहयो अंतर्गत फळबाग लागवड करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here