Home परभणी रोहयो अंतर्गत फळबाग लागवड करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

रोहयो अंतर्गत फळबाग लागवड करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

122
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220527-WA0006.jpg

रोहयो अंतर्गत फळबाग लागवड करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

युवा मराठा न्युज नेटवर्क:- शत्रुघ्न काकडे पाटील
जिंतूर (परभणी):
तालुक्यातील जोगवाडा येथे जिल्हाधिकारी अंचल गोयल यांनी शेतकऱ्यांना रोहयो अंतर्गत फळबाग लागवड करण्याचे आवाहन केले. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती होवुन शेतकरी कुटुंबांना इतर जिल्ह्यात स्थलांतरीत होण्याची गरज पडणार नाही. असेही त्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगीतले.जोगवाडा येथे गुरुवार २६ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते सिंचन तलावातील गाळ लोकसहभागातून काढण्याचे उदघाटन करण्यात आले यावेळी अंचाल गोयल बोलताना म्हणाल्या की परिसरातील पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेतून समूह पद्धतीने एका फळपिकाची निवड करून लागवड करावी जेणेकरून शेतकऱ्यांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होईल व शेतकरी कुटुंबाना कामासाठी इतर जिल्ह्यात स्थलांतरित होण्याची गरज पडणार नाही असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्यांना केले. या प्रसंगी उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार, रोहयो उपजिल्हाधिकारी डॉ अरुण जऱ्हाड, तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी अमृत सरोवर निर्मिती, इ फेरफार नोंदणी, ईपीकपहाणी इ. बाबत मार्गदर्शन केले. तसेच तालुका कृषि अधिकारी शंकर काळे यांनी बियाणे उगवण तपासणी, माती तपासणी, बीज प्रक्रिया, सरीवरंबा पद्धतीने सोयाबीन पेरणी, उताराला आडवी पेरणी इ. बाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी गावच्या सरपंच वाळके, महसूल व कृषि विभागाचे गाव पातळीवरचे सर्व कर्मचारी तसेच सोनापूर सोस, जोगवाडा परिसरातील शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here