Home गुन्हेगारी अवैध रेती वाहतूक करणाऱ्यानो न्यायदेवता तुम्हाला सोडणार नाही! बुलडाणा न्यायालयाने दोघांना अशी...

अवैध रेती वाहतूक करणाऱ्यानो न्यायदेवता तुम्हाला सोडणार नाही! बुलडाणा न्यायालयाने दोघांना अशी अद्दल घडवली की, रेती चोरीचा विचार त्यांच्या स्वप्नातही येणार नाही!

52
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220525-WA0016.jpg

अवैध रेती वाहतूक करणाऱ्यानो न्यायदेवता तुम्हाला सोडणार नाही! बुलडाणा न्यायालयाने दोघांना अशी अद्दल घडवली की, रेती चोरीचा विचार त्यांच्या स्वप्नातही येणार नाही!
ब्युरो चिफ स्वप्निल देशमूख यूवा मराठा न्यूज बूलडाणा

बुलडाणा -: विना परवाना रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या दोघांना बुलडाणा न्यायालयाने २ वर्षें सश्रम कारावास व १० हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. काल,२४ मे रोजी न्यायालयाने हा निकाल दिला.

gode

बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पीएसआय सैय्यद मजहर हे मागील १५ नोव्हेंबर २०१६ रोजी रात्री पेट्रोलिंग करत होते. यावेळी त्यांनी तांदुळवाडी फाट्याजवळ धाड येथून येणाऱ्या( एम एच २८- एबी ७६१६ क्रमांकाच्या) टिप्परला अडविले. वाहनातील बळीराम पांडूरंग उबरहांडे व विष्णू सुखदेव गावंडे ( रा. खासगाव, ता. जाफराबाद, जि. जालना) यांच्याजवळ कोणताही परवाना नसल्याचे व वाहनात ३ ब्रास रेती असल्याचे आढळून आले. त्यांच्याविरुद्ध बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

प्रकरणी एएसआय सखाराम कोरडे यांनी तपास करून प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमोल देशपांडे यांच्या न्यायालयात दोषारोप पत्र सादर केले. खटल्यात सहाय्यक सरकारी वकील प्रभाकर मंगळकर यांनी केलेला प्रभावी युक्तिवाद, ५ जणांची साक्ष लक्षात घेऊन न्यायाधीशांनी दोघा आरोपींना दोन वर्षांचा करावास व ९० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास आरोपींना आणखी ६ महिने साधी कैद भोगावी लागणार आहे.

Previous articleएकल वापर प्लास्टीक वापरावर 1 जुलै पासून बंदी – जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर
Next articleअण्णासाहेब पाटील ट्रॅक्टर योजना सुरु करण्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा यांचे आदेश.
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here