Home नांदेड तोतया वनपरिक्षेत्र अधिकारी बनून फिरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद.

तोतया वनपरिक्षेत्र अधिकारी बनून फिरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद.

65
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220525-WA0011.jpg

तोतया वनपरिक्षेत्र अधिकारी बनून फिरणाऱ्यास स्थानिक गुन्हे शाखेने केले जेरबंद.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नांदेड – मागील काही दिवसापासून शहरासह जिल्ह्यात वनविभागाची खाकी वर्दी घालुन रेंज फॉरेस्ट ऑफिसर या पदाचे बनावट ओळखपत्र तयार करून फसविणाऱ्या तोतया वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांस दिनांक २४ मे रोजी रात्री नांदेड लातूर फाटा परिसरातून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली असून त्याच्याकडून वनविभागाचा लोगो असलेली दुचाकी व खाकी वर्दी पोलिसांनी जप्त केली आहे. जिल्ह्यात जंगल परिसरात वन अधिकारी म्हणून फिरणारा हा भामटा गेल्या काही दिवसापासून पोलिसांना व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनीही हातावर तुरी देऊन पसार होत होता. अखेर हा भामटा वन अधिकारी लातूर फाटा, दुध डेअरी रोड येथे असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर यांना कळताच त्यांनी आपले सहकारी अधिकारी दत्तात्रय काळे यांच्या पथकाला रवाना केले. निवघा ता. हदगाव येथे राहणारा कपिल पाईकराव नावाचा अधिकारी वन विभागाची वर्दी अंगावर घालून स्कुटी सह उभा होता. पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने स्वतः कडे असलेले फिरते पथक ओळख पत्र दाखवले. ओळखपत्र व नावाची खात्री वनविभागात केल्यानंतर हा अधिकारी आमच्याकडे नाही याची खात्री पटल्याने पोलिसांनी त्यास अटक केली असून या भामट्या विरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात कारवाई सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here