Home नांदेड न.पा. प्रशासन अनाधिकृत बॅनर नंतर अतिक्रमण हटावसाठी सक्रिय व्यापाऱ्यांना दिले नोटीस ;...

न.पा. प्रशासन अनाधिकृत बॅनर नंतर अतिक्रमण हटावसाठी सक्रिय व्यापाऱ्यांना दिले नोटीस ; स्वयंस्फूर्तीने व्यापाऱ्यांनी काढले अतिक्रमण

53
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220519-WA0038.jpg

न.पा. प्रशासन अनाधिकृत बॅनर नंतर अतिक्रमण हटावसाठी सक्रिय

व्यापाऱ्यांना दिले नोटीस ; स्वयंस्फूर्तीने व्यापाऱ्यांनी काढले अतिक्रमण

नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
नगर परिषदेवर देगलूरच्या सहायक जिल्हाधिकारी तथा आय.ए.एस.असलेल्या सौम्या शर्मा प्रशासक म्हणून रुजू होताच शहराचे ‘परिवर्तन’ करण्याचा त्यांनी निश्चय केल्याचे दिसते. शहरात नगर परिषद प्रशासनाने स्वच्छतेवर विशेषभर दिल्याचे निदर्शनास येत आहे. शहरातील अनाधिकृत बॅनर, झेंडे, सार्वजनिक रस्त्यावरील अतिक्रमणे हटविले जात आहे. यंदा घनकचरा व्यवस्थापनाचे काम कंधार तालुक्यातील संस्थेस दिल्याने स्वच्छता दिसून येत आहे. नगर परिषदेवरील ‘प्रशासकराज’ मुळे शहरात विकासाच्या दृष्टीने ‘परिवर्तन’ होणार असल्याची चर्चा होत आहे.
नगर परिषदेतील जनतेतून निवडून आलेल्या सदस्यांचा कार्यकाळ फेब्रुवारी महिण्यात संपला यानंतर नगर परिषदेवर ‘प्रशासकराज’ सुरु झाला. सद्या प्रशासक म्हणून देगलूर उपविभागाचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी म्हणून आय.ए.एस.असलेल्या सौम्या शर्मा कारभार पाहत आहेत. तसेच मुख्याधिकारी पदावर धनंजय थोरात रुजू आहेत. प्रशासक, मुख्याधिकारी, नगर परिषदेच्या कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी सर्व जण मिळून विकासात्मक काम करत असल्याचे दिसते. सहायक जिल्हाधिकारी तथा प्रशासक सौम्या शर्मा यांच्या आदेशाने शहरात अनाधिकृत बॅनर मुक्त झाले आहे. तसेच शहरातुन जाणाऱ्या राज्य महामार्गावरील लोखंडे चौक ते अण्णाभाऊ साठे चौक, बाऱ्हाळी नाका मधील दुभाजकातील कचरा हटवून बाजूला अनेक वर्षापासून साचलेली धूळ स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱ्यांनी हटविली. शहरात घंडागाडी सुरु झाल्याने गल्लोगल्ली साचणारा कचरा आता कमी झाला आहे. नगर परिषद प्रशासनाने शहरातील व्यापाऱ्यांना नोटीस देऊन प्रतिष्ठान, हातगाडे, पानपटी व दुकानातील ओला व सुका कचरा उघड्यावर न टाकता नगर परिषदेच्या घंटागाडीत टाकावे अन्यथा दंडात्मक कारवाईचा ईशारा नोटीसद्वारे देण्यात आले. तसेच सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीसाठी अडथळा निर्माण करणारे अनाधिकृत फलक, अतिक्रमणे तात्काळ काढून हटवावे यासाठी व्यापाऱ्यांना नोटीस देण्यात आले. नपा प्रशासनाची नोटीस मिळताच अनेक व्यापाऱ्यांनी स्वयस्फुर्तीने रस्त्यावरील अतिक्रमणे हटविले. प्रशासकराज मुळे शहरात होत असलेल्या बदलामुळे नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here