Home गडचिरोली कमलापूर ला परत नक्षल्यांचा माहेरघर बनू द्यायचा आहे का ?

कमलापूर ला परत नक्षल्यांचा माहेरघर बनू द्यायचा आहे का ?

74
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220514-WA0038.jpg

कमलापूर ला परत नक्षल्यांचा माहेरघर बनू द्यायचा आहे का ?

 

एका शासकीय कार्यक्रमात उच्च अधिकारी भाषण देतांना बोलले, गुगल वरती आपण गडचिरोली सर्च केला तर काय येते वेगळा सांगायची गरज नाही. हो हे खर आहे गडचिरोली म्हटला तर नक्षल आणि त्याच्या कारवाह्या या पेक्षा फार काही वेगळा दिसणार नाही. त्यातल्या त्यात ‘कमलापूर’ म्हणजे नक्षल्यांचे माहेरघरच अशी ओळख झाली. परंतु मागील काही वर्षाचा इतिहास बघता पोलीस विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या “आत्मसमर्पण” उपक्रमाच्या माध्यमातून बऱ्याच जहाल नक्षल्यांनी आत्मसर्पण केले. इतकेच नाही तर त्या माध्यमातून एक चांगले शांत आणि सुखी जीवन जगत असल्याचे चित्र सुधा आपल्याला दिसत आहे. हे जिल्ह्यासाठी आणि येथील लोकांसाठी अतिशय सकारत्मक बाब आहे. जे कमलापूर नक्षलींचे माहेरघर म्हणून ओळखल्या जात होते ते आता फक्त जिल्ह्यातीलच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील ह्तीचे वास्तव असणारे एकमेव हत्ती कॅम्प म्हणून उदयास आले. आणि जिल्ह्याकडे पाहण्याचा इतरांचा व पर्यटकाचा दृष्टीकोन बदलू लागला आणि लाँकडाउन पासून तर स्थानीक पर्यटनाला एक नवी दिशाच मिळाली जणू बरेच छोट्या मोठ्या पर्यटन स्थळांचा उदय होऊ लागला. इतकेच नाही तर हा जिल्हा वनांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध आहे. जिल्ह्यात जवळपास 76% वने असून उंच उंच झाडे विशेषतः (सागवन), वेली, वनऔषधी, विविध प्रकारची जैवविविधता हीच इथली खरी वनसंपत्ती आहे. वर्धा, वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती सारख्या मोठ्या नद्याचे संघम, मार्कंडा, अरकतोंडी, मुतनुर, चपराळा, टिपागड, बिनागुंडा सारखी अनेक धार्मिक व नैसर्गिक पर्यटन स्थळे, इथे असलेले मोठ्या संख्येने आदिवासी बांधव, त्यांचा राहणीमान, खानपान, पेहराव हीच खरी संस्कृती आणि ओळख ह्या निसर्गरम्य गडचिरोली जिल्ह्याची आहे.

जिल्ह्यात मोठ्या संख्येने जंगल असल्याने इथे मोठे उद्योग निर्माण होऊ शकत नाही आणि पर्यावरणाचे संवर्धन करायचे असले तर जिल्ह्यात कदाचित त्याची गरजही नाही. परतू स्थानिकांना रोजगार मिळवून देनेही तितकेच गरजेचे आहे. सद्या वाढत चालेल्या औद्योगीकरणाच्या जगात सर्वाना काही काळ निसर्गाच्या सानिध्यात रहाव वाटते, थोडा मोकळा श्वास घ्यावा वाटते आणि त्या साठी निसर्ग असणे अत्यंत गरजेचे आहे. आणि हि सर्वांची गरज पूर्ण करण्याची ताकत येणाऱ्या काळात फक्त आणि फक्त गडचिरोली सारखा निसर्गरम्य जिल्हाच पूर्ण करू शकतो. परंतु सद्याची परिस्थिती पाहता पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत असलेल्या कमलापुरातील हत्ती गुजरात च्या जामनगर येथील खासगी संस्थेच्या प्राणीसंग्रहालयात पळवून नेले जात असतील तर, हत्तीचे माहेर घर म्हणून उदयास आलेला कमलापूर परत नक्षल्याचे माहेर घर तर होणार नाही ना याचा प्रशासनाने विचार करावा ? कमलापुरात सद्या ८ हत्ती आहेत त्यातील वयोवृद्ध, आणि अप्रशिक्षित लहान हत्ती मिळून चार हत्तीचे नेल्या जाणार तर ४ हत्ती इथेच ठेऊन त्याची सोय संपूर्ण संबंधित संस्था करणार त्यातून अनेकांना रोजगार मिळणर असल्याचे सांगितले जात आहे, परंतु हेच हत्ती काही वर्षांनी वृद्ध झाले किंवा इतर कारणाने परत गुजरात ला नेण्यात आले तर या हत्ती कॅम्प मध्ये राहणार काय? हाही प्रश्न उभा राहतो. हत्ती नायचेच होते तर काही महिन्या पूर्वी परराज्यातून आलेल्या जंगली हत्तींनी जिल्ह्यातील अनेक लोकांचे त्यांच्या पिकांचे नुकसान केले मग त्या ह्तीना न नेता ह्या शांत हत्तींना नेण्याचा का हा प्रयत्न? ह्या माध्यमातून कुठे ना कुठे जिल्ह्याचा वैभव संपविण्याचा तर प्रयत्न होत नाही ना? ह्या पेक्षा येथील पर्यटन विकासाला शासन का चालना देत नाही? येथील वनसंपत्ती वर आधारित विविध पर्यावरण पूरक उद्योग उभे राहू शकतात त्यातून अनेकांना रोजगारही मिळू शकतो परंतु त्या साठी हव्या त्या प्रमाणात प्रयत्न झाल्याचे दिसूनही येत नाही.

काही दिवसापूर्वी हत्तीच्या स्थलांतराची बातमी प्रकाशित झाली असताना येथील स्थानिक आमदार, खासदार व इतर राजकीय पक्षाच्या पुढार्यांनी येथील हत्ती कुठेही जाऊ देणार नाही, नेण्याचा प्रयत्न केल्यास आपण तीव्र आंदोलन करून म्हणून मोठ्या बाता केल्या मग आज शासनाकडून स्थलांतराचा पत्र आलेला असतना स्थानिक लोक प्रतिनिधी, जिल्हाय्तील आमदार खासदार निद्रा अवस्थेत आहेत काय ? नसतील तर अजूनही या प्रश्नावर आवाज का उठवला नाही ? की पक्ष श्रेष्टीच्या पुढे बोलायची आणि आपल्या जिल्ह्यातील प्रश्न मांडण्याची यांच्यात हिम्मत नाही का ? अश्या अनेक प्रश्न जिल्ह्यातील एक सामान्य नागरीक म्हणून मला पडतो आणि त्याच प्रश्नाच्या उत्तराच्या प्रतीक्षेत……..

 

—— अनुप कोहळे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here