Home नांदेड जागतिक परिचारीका दिवस व कोरोना योद्धा सन्मान समारोह ब्रह्मा कुमारीज व उपजिल्हा...

जागतिक परिचारीका दिवस व कोरोना योद्धा सन्मान समारोह ब्रह्मा कुमारीज व उपजिल्हा रुग्णालय देगलुर द्वारा जल्लोषात साजरा.

129
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220513-WA0027.jpg

जागतिक परिचारीका दिवस व कोरोना योद्धा सन्मान समारोह ब्रह्मा कुमारीज व उपजिल्हा रुग्णालय देगलुर द्वारा जल्लोषात साजरा.
नांदेड जिल्हा ब्युरो चीफ मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
दिनांक : 12 मे , 2022 :– आजादिच्या अम्रूत महोत्सवातुन स्वर्णीम भारताकडे कार्यक्रमा निमीत्य उपजिल्हा रुग्णालय देगलुर वैद्यकिय अधिक्षक डॉ .शिवशंकर वलाण्डे सर , देगलुर सेवाकेन्द्र संचालिका लक्ष्मी बहेन्जि , विद्या बहेन्जि , बालरोग चिकित्सक डॉ . विश्वनाथ मलशेटवार , बधीरी करण चिकित्सक डॉ.संभाजी पाटील , स्त्री रोग चिकित्सक डॉ . ठक्करवाड प्रदीप , स्त्री रोग चिकित्सक डॉ . अपर्णा पपुलवाड , अस्थी रोग चिकित्सक डॉ . रवी काळे , वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय लाडके , डॉ. मुजीब सर , डॉ . सुनील जाधव , एस. एन. बिरादार सर , नगर सेवक प्रशांत दासरवाड , चंद्रकांत मोरे नाना , ईण्चार्ज सिस्टर मनिषा बोईंनवाड , गजेंद्र भाई , सर्व सिस्टर , ब्रदर , सफाई कामगार , वार्ड बॉय , सर्व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीस दिप प्रज्वलन झाले नंतर प्रास्थाविक व प्रार्थना प्रियंका धान्दू यांनी तर स्वागत गीत सुनिता देवकत्ते यांनी सादर केले . मंचावर उपस्थित अतिथी चे पुष्प गुच्छ देऊन स्वागत झाले .डॉ. सुनील जाधव यांनी प्रार्थना गीत तुम्हीं हो माता पिता तुम्हीं हो गाऊन कार्यक्रमा ची सुरूवात झाली . सर्व अतिथी नी या मंगल प्रसंगी शुभेच्छा दिल्या . डॉ.ठक्करवाड प्रदीप यांनी भेट वस्तू व नगर सेवक प्रशांत दासरवाड यांनी पुष्प गुच्छ देऊन सर्व परिचारीका भगीनीना शुभेच्छा दिल्या.डॉ.सुनील जाधव यांनी ब्रह्मा कुमारीज याचे 147 देशात वेगवेगळ्या 22 विभागा मार्फत जगाला स्वर्णीम युगाकडे नेण्याचे कार्य कसे चालते व सर्व डॉक्टर्स , सिस्टर , आरोग्य कर्मचारी यांनी कशी जीव धोक्यात घालुन कोविड काळात सेवा केली या बद्दल परिचय दिला . डॉ .शिवशंकर वलाण्डे यांनी जीवनावश्यक ऑक्सिजन पूर्तता कोविड मधे कशी केली व कोविड रुग्णांना कसा दिलासा मिळाला या बद्दलचे सविस्तर सांगुन सर्व सिस्टर ,आरोग्य कर्मचारी यांनी कशी जीव धोक्यात घालुन कोविड काळात सेवा केली या बद्दल वर्णन करून सर्वांना शुभेच्छा दिल्या .बहेनजी यांनी कोरोना योद्धे यांचा सन्मान केला, त्यांच्या कार्याची जाणीव ठेऊन हा सोहळा ठेवला हे उल्लेखनीय आहे असे गौरवौद्गार काढले .देगलुर सेवाकेन्द्र संचालिका लक्ष्मी बहेनजी विद्या बहेनजी यांनी आशिर्वचन पर सम्बोधन करताना म्हणाले की कोरोना सारख्या महामारीत आपल्या जीवाची , परिवाराची पर्वा न करता सर्व डॉक्टर्स , सिस्टर्स , सफाई कामगार , वार्ड बॉय , आरोग्य कर्मीं नी सेवा करून जन सेवा हीच ईश्वर सेवा केली , अशा दर्द नाक परिस्थिती मधे परिवारा पासुन दुर राहुन दुसऱ्याच्या जिवाच्या रक्षणाची धुरा सावरली व अश्या विरांचा जागतिक परिचारिका दिवशी सन्मान होने अति गरजेचे आहे असे म्हणुन डॉक्टर्स , सिस्टर्स , आरोग्य कर्मीं अशा सर्व कोरोना योद्धे यांचा ईश्वरीय चुन्नी , टोली प्रसाद , पेन , पुस्तक , कोविड योद्धा प्रमाण पत्र देऊन सन्मान केला . या सोहळ्याचे सूत्र संचालन डॉ.संजय लाडके यांनी केले . या जागतिक परिचारिका दिवशी आमचा सन्मान केला त्या बद्दल एनचार्ज सिस्टर मनिषा बोईंनवाड यांनी सर्व सिस्टर व आरोग्य कर्मचारी यांच्या वतीने आभार मानले .

Previous articleकमलापूर ला परत नक्षल्यांचा माहेरघर बनू द्यायचा आहे का ?
Next articleराजपुत करणी सेना ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी पृथ्वीसिंह चौहान व तालुकाध्यक्ष पदी चरणसिंह चौहान यांची बिन विरोध निवड
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here