Home नांदेड प्रा. मारोती लक्ष्मणराव सोनकांबळे यांची अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल.

प्रा. मारोती लक्ष्मणराव सोनकांबळे यांची अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल.

166
0

राजेंद्र पाटील राऊत

प्रा. मारोती लक्ष्मणराव सोनकांबळे यांची अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
देगलुर बिलोली विधानसभा मतदार संघाची पोटनिवडणूक लढवण्यासाठी प्रा. मारोती लक्ष्मणराव सोनकांबळे यांनी आज अपक्ष उमेदवारी दाखल केली. प्रा. मारोती लक्ष्मणराव सोनकांबळे हे एम. ए. एम. फिल. सेट. असून ते देगलुर परिसरात शैक्षणिक क्षेत्रात गेल्या दहा वर्षापासून कार्यरत आहेत. तसेच ते देगलूर महाविद्यालयात देगलुर , व धुंडा महाराज महाविद्यालय, आणि सिंधू कॉलेज येथे शैक्षणिक कार्य केले. त्यांनी अत्यंत गरिबीतून आपले उच्च शिक्षण नांदेड,पुणे तामिळनाडू येतून घेतले तसेच पुणे येथे अध्याप नाचे काम केले आहे.
तसेच त्यांनी बालपणापासूनच शेतमजुरी,देगलुर येथे टेलिफोन लाईन चे काम, निझामाबाद येथे सायकल रिक्षा चालवले, ड्रायव्हर, करत आपले उच्च शिक्षण पूर्ण केले. आणि आपल्या कष्टाच्या बळावर आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण केले. या काळात त्यांना जे अत्यंत वाईट अनुभव आले. येथील शासन व्यवस्थेच्या बेजबाबदार धोरणामुळे अनेक तरुणाचे आयुष्य आणि भविष्य बर्बाद झाले. गेल्या १३ वर्षापासून महाराष्ट्रातील व देशातील राज्यकर्त्यांनी फक्त खोटे आश्वासने देऊन तरुण पिढीचे आयुष्य उद्ध्वस्त केले. आज प्रत्येक कुटुंबातील युवक व युवती बेरोजगारीमुळे त्रस्त आहेत. अनेकांचे लग्नाचे वय उलटूनही लग्न होत नाहीत ज्यांची झाले त्यांची टिकतील का नाही अशी गंभीर परिस्थिती आज निर्माण झाली असून प्रत्येक कुटुंबातील आई-वडिलांना मुलांच्या भविष्याची चिंता भेडसावत आहे. शेतकऱ्यांच्या मजुरांच्या गोरगरिबांच्या मुलाचे पात्रता असूनही त्यांना न्याय का देत नाही. हा प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी न्याय हक्कासाठी निवडणुकीचा मार्ग निवडला आहे. अशी प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली.

Previous articleपिकविम्यासाठी सोयाबीन पिकाचा समावेश – जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर
Next articleआगामी नगर परिषदेची निवडणूक प्रहार स्वबळावर लढणार – शंकर भाऊ वड्डेवार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here