राजेंद्र पाटील राऊत
उमेदवारांनो इकडे लक्ष द्या!! महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर ! लवकरच गुलाल उडणार
पिंपरी चिंचवड प्रतिनिधी ) उमेश पाटील
राज्यातील महापालिकेच्या निवडणुकांची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. महापालिकेसह नगरपालिका, नगरपंचायती आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे राज्यात निवडणुकीचा धुरळा लवकरच उडणार आहे.
महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत आणि जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. कारण याबाबत राज्य निवडणुक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. यावरून आता महापालिका निवडणुका 17 जून, नगरपालिका निवडणुका 22 जून, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडुका 11 जूलै तर ग्रामपंचायतीच्या निवडणुका या 2 जुलैला होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, मागील काही महिन्यापासून राज्यातील निवडणुकांबाबत चर्चा सुरू होत्या. ओबीसी आरक्षण आणि इतर कारणांमुळे या सर्व निवडणुका रखडल्या असल्याने यासंबंधी राजकीय नेत्यांनी आपपली भूमिका स्पष्ट केली होती. जोपर्यंत ओबीसी आरक्षण मिळत नाही.तोपर्यंत राज्यातील निवडणुका होणार नाही, अशी भूमिका सत्ताधारी पक्षांसोबतच विरोधी पक्षांनी देखील मांडली होती.