Home Breaking News जोगवाडा पाटीजवळ उसाचा ट्रक पलटी

जोगवाडा पाटीजवळ उसाचा ट्रक पलटी

36
0

Anshuraj Patil

जोगवाडा पाटीजवळ उसाचा ट्रक पलटी
ब्युरो चीफ परभणी :-शत्रुघ्न काकडे पाटील
जिंतूर जालना महामार्गावरील जोगवाडा पाटीजवळ उसाचा ट्रक पलटी झाल्याची घटना आज मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास घडली. यामध्ये ट्रकचालक व त्यासोबतचा एक जण जखमी झाला आहे. परिसरातील नागरिकांच्या मदतीने जखमींना जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की जालनाकडून जिंतूरकडे ऊस घेऊन जाणारा ट्रक क्रमांक एम. एच. 09 सी. डब्लू. 9288 हा जोगवाडा पाटी जवळील वळणावर आला असता, चालकाचा ट्रक वरील अचानक ताबा सुटल्याने, ट्रक रस्त्यावर पलटी झाला. यामध्ये ट्रक चालक व त्याच्यासोबत असलेला एक जण जखमी झाला आहे. जखमींना जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. ऐन रस्त्यावर ट्रक पलटी झाल्याने महामार्गावर तब्बल एक तास वाहतूक ठप्प झाली होती. चारठाणा पोलीस व महामार्ग पोलिसांच्या मदतीने सदर अपघातग्रस्त ट्रक रस्त्याच्या कडेला येऊन वाहतूक सुरळीत करण्यात आली. सदर अपघातामध्ये जखमी झालेल्यांची नावे मात्र समजू शकली नाही.

Previous articleजैताणे-निजामपुर डाॅक्टर, संघटनेच्या अध्यक्षपदी डॅा.महेश विठ्ठलराव ठाकरे यांची निवड
Next articleउमेदवारांनो इकडे लक्ष द्या!! महापालिका निवडणुकीची तारीख जाहीर ! लवकरच गुलाल उडणार
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here