Home उतर महाराष्ट्र झिरणीपाडा,येथील कुलस्वामीनी धनाई- पुनाई माता यात्रा उत्सव संपन्न

झिरणीपाडा,येथील कुलस्वामीनी धनाई- पुनाई माता यात्रा उत्सव संपन्न

173
0

राजेंद्र पाटील राऊत

IMG-20220416-WA0005.jpg

झिरणीपाडा,येथील कुलस्वामीनी धनाई- पुनाई माता यात्रा उत्सव संपन्न

दिपक जाधव

धुळे/साक्री सालाबादप्रमाणे या वर्षी १५एप्रिल रोजी साक्री तालुक्यातील माळमाथा परीसरातील झिरणीपाडा गावातील बुराई नदीच्या काठावर वसलेली कुलस्वामिनी धनाई -पुनाई माता यात्रा उत्सव संपन्न झाला,लाखोंच्या संख्येनें भक्तांची गर्दी बघता,परीसरातील जागा कमी पडु लागली होती,पण शेती मालकांनी शेत जमीन रिकामी करून माणुसकीचे दर्शन घडवत ,भक्तासाठी अनमोल सहकार्य केले,भर उन्हात कुठलीही उणीव भासु न देता सहकार्य केले,
तसेच हजारोंच्या संख्येवर बोकडांचे नैवेद्य धुनाई पुनाई मातेस भक्ताकडुण देण्यात आला.दोन वर्षाच्या करोना मुळे यात्रा,सण,उत्सव,बंद असल्यामुळे ,या वर्षी अलोट गर्दी पहायला मिळाली,होटेल, पाळणे,खेळणी विक्रेता,बघता,लहान मुलांच्या आनंदाने परीसर अगदी दुमदुमद होता,तसेच ,भक्तांची अलोट गर्दी बघता,निजामपूर पोलीस स्टेशन कडुन चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता,तसेच,या वर्षी तालुक्याचे आमदार सौ,मंजुळाताई गावित,शिवसेना जिल्हा प्रमुख मा,डा,तुळशीराम गावित,यांनी देविचे सप्तनिक दर्शन घेतले,या वेळी, झिरणीपाडा च्या माजी संरपंच,जिजाबाई महाले, सरपंच पुनम बागुल,सुरेश चौरे,धनराज पवार,महेन्द्र महाले,प्रशांत गायकवाड, अनिल गायकवाड, नाना माळचे,प्रविण महाले,अजय महाले,अरविंद महाले, श्रिराम गायकवाड तसेच ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

Previous articleकळमदरेत महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी
Next articleविश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती गजानन पा. चव्हाण यांच्या पुढाकाराने साजरी
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here