राजेंद्र पाटील राऊत
महाडिबीटी पोर्टलच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थी शिष्यवृती पासून वचिंत
मुखेड / प्रतिनिधी
संग्राम पाटील तांदळीकर
महाडीबीटी या पोर्टलवर शासनाच्या वतीने विविध शिष्यवृत्ती योजनेचा लाभ मागास्वर्गीय , खुला प्रर्वग , अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना दिला जातो. त्यामुळे विद्यार्थी हे शिष्यवृत्तीचा लाभ मिळवण्या करीता विहीत नमुन्यात महाडीबीटी या पोर्टलवर अर्ज करत असतात. मात्र महाडीबीटी पोर्टलच्या ढिसाळ आणि नियोज शून्य कारभारामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
या पोर्टलवर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर सदरील अर्ज महाविद्यालयाच्या लाॅगीनवर गेले असता.महाविद्यालयात तपासणी करत असताना स्टुडन्ट बेनिफिट डिटेल्समध्ये कसल्याही प्रकारची फि दिसून येत नसल्याने. सदरिल शिष्यवृत्तीचे अर्ज महाविद्यालय स्तरावरच प्रलंबित राहत आहेत. त्यामुळे विभागीय कार्यालय हे महाविद्यालयाला वारंवार पत्र पाठवून महाविद्यालय स्तरावरील अर्ज निकाली काढण्याचे पत्र देत आहेत. पंरतू महाविद्यालय स्तरावर वरिल प्रमाणे येत असलेल्या अडचणीमुळे महाविद्यालये सुद्धा विद्यार्थ्यांचे अर्ज विभागिय कार्यालयालास पाठवण्यास असमर्थ आहेत.
सदरिल समस्या कशा प्रकारे सोडवता येतील या संदर्भाने कसल्याही प्रकारचे मार्गदर्शन विभागीय कार्यालयाकडून मिळत नसल्यामुळे अर्जाची स्थिती जैसे थे अशिच राहत असल्याची माहिती नाव न सांगण्याच्या अटीवरून एक वरिष्ठ महाविद्यालयातील शिष्यवृती विभागाच्या कर्मचाऱ्यांनी दिली आहे.वरिल अडचणी दुर करण्यासाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या लाॅगीन वरून महाडीबीटीने दिलेल्या तक्रार निवारण या पोर्टलवर विद्यार्थ्यांना तक्रार करण्यास सांगत आहेत. त्या ठिकाणी देखील तक्रार करत असताना विद्यार्थ्यांना अनेक अडचणी समोर येत आहेत.
त्या खालील प्रमाणे
१) तक्रार करत असताना विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात माहिती भरावी लागते.
२) जेव्हा ज्या ठिकाणी लेखी स्वरूपात तक्रार नोदणीं करायची असते त्या ठिकाणी शब्द मर्यादा आहे. व सोभत जोडण्यात येणारे तुरटीची फोटोकाँपी एका विशिष्ट मर्यादितच अपलोड करावी लागते.त्याच बरोबर एखाद्या विद्यार्थ्यांने वरिल सर्व माहिती भरून तक्रार केलीच तर त्या तक्रारीची नोंद होत नाही.त्याठिकाणी वार्निंग येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ऐकणूच तक्रारीची प्रक्रिया ही वेळखाऊ असल्यामुळे विद्यार्थी देखील तक्रार करण्यास टाळाटाळ करत असतात.
३ ) तक्रार करत असताना इंग्रजी भाषेत माहिती समोर येत असल्याने अनेक विद्यार्थी तक्रारीच करत नाहीत.
आज घडीला शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांची स्थिती ही ‘माय भाकर देत नाही आणि बाप भीक मागू देत’ नाही अशी झाली आहे.त्यामुळे संबधित विभागाने तात्काळ याची दखल घेऊन विद्यार्थ्यांना येणाऱ्या या अडचणी सोडवणे गरजेचे आहे.
चोकट
” विद्यालय , महाविद्यालय व विद्यापीठ स्तरावरील सद्या परिक्षा सुरू आहेत.तर दुसरीकडे महाडीबीटीच्या अंतिम तारका देखील याच महिन्यात येत असल्याने विद्यार्थ्यांनी परिक्षा द्याव्या, का शिष्यवृत्ती फाॅम्रवर येणाऱ्या त्रुटीची पूर्तता करावीत. हेच सुचत नसल्याने गोंधळून जात आहेत.त्यामुळे संबधीत विभागाने याची दखल घेऊन विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती फाॅम्रवर येणाऱ्या त्रुटी तात्काळ दूर करून शिष्यवृत्ती अर्ज मंजूर करून विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा करावी.अन्यथा एसएफआय विद्यार्थी संघटना विद्यापीठ कमिटी नांदेड च्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
– काॅम्रेड पवन जगडमवार सदस्य एस. एफ.आय विद्यार्थी संघटना विद्यापीठ कमिटी नांदेड