Home मराठवाडा बँक कर्मचाऱ्यांस पत्रकारांना शिवीगाळ करणेपडले महागात जिंतूर पोलिसात गुन्हा

बँक कर्मचाऱ्यांस पत्रकारांना शिवीगाळ करणेपडले महागात जिंतूर पोलिसात गुन्हा

326
0

राजेंद्र पाटील राऊत

बँक कर्मचाऱ्यांस पत्रकारांना
शिवीगाळ करणेपडले महागात
जिंतूर पोलिसात गुन्हा

जिंतूर,(विष्णू डाखूरे प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)

जिंतूर: शहरातील सुंदरलाल सावजी बँकेचे कर्मचाऱ्याने पत्रकारांना उद्देशून अण्णाभाऊ साठे चौकात सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ केल्याने या कर्मचाऱ्यांविरुद्ध जिंतूर पोलिसात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की 26 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साठे चौक येथे सार्वजनिक ठिकाणी जिंतूर येथील नामांकित सुंदरलाल सावजी अर्बन बँकेचे कर्मचारी वैजनाथ डोंबे यांनी पत्रकारांना उद्देशून सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ केली याप्रकरणी पत्रकार शेख रफिक शेख चांद यांनी त्यास विचारणा केली असता त्याने मी सावजी बँकेत नोकरीला आहे असे म्हणल्यानंतर पत्रकार शेख रफीक व पत्रकार निषाद आहेमद यांनी सावजी बँकेत जाऊन तेथील मनेजर लक् ॅ ष्मण खंडागळे यांना भेटून सदर प्रकार सांगितला असता त्यांनी वैजनाथ डोबे यांना विचार केली असता त्याने मी कोणाचे नाव घेतले नाही पण शिवीगाळ केली आहे असे कबूल केले. पण मी माफी मागणार नाही तुम्हाला काय करायचे ते करा असे म्हणत परत धमकी दिली म्हणून अशी फिर्याद पोलिसात दिल्याने वैजनाथ डोंबे राहणार शिवाजीनगर यांच्याविरोधात जिंतूर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक शिंदे करत आहेत.

Previous articleमहाडिबीटी पोर्टलच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थी शिष्यवृती पासून वचिंत  
Next article“कोल्हापूरच्या राजाराम महाविद्यालयाने पटकावला राज्यस्तरीय कर्मवीर काव्य करंडक”
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here