राजेंद्र पाटील राऊत
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त संभाजी ब्रिगेडच्या वतीने हसनाळ (प.मू.)येथे रक्तदान शिबिराचे आयोजन.
नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज
रयतेचे राजे श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे संभाजी ब्रिगेड मुखेड कडून आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ह.भ.प विठ्ठल महाराज तर कार्यक्रमाचे अध्यक्ष संग्रामअण्णा मळगे प्रमुख पाहुणे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर,दिनेशअप्पा आवडके युवक काँग्रेसचे ता.अध्यक्ष किरण पाटील जाहुरकर,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाउपाध्यक्ष अनिल पाटील दापके,संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष प्रदिप पाटिल हसनाळकर,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हरिदास पाटील,संभाजी ब्रिगेडचे सोशल मीडिया अध्यक्ष बळवंत पाटील बोडके,विधानसभा अध्यक्ष मनोज पाटिल इटग्याळकर,शिवा पाटील भाटापुरकर,स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राम पाटील इतर आमचे तरुण सहकारी मित्र,रक्तदाते आदी मंडळी उपस्थित होते.