Home नांदेड वनविभागाच्या धडक कार्यवाहीत दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

वनविभागाच्या धडक कार्यवाहीत दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

274
0

राजेंद्र पाटील राऊत

वनविभागाच्या धडक कार्यवाहीत दोन लाखाचा मुद्देमाल जप्त

नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड तालुक्यातील येवती,बाऱ्हाळी , मुक्रमाबाद , परिसरात सागवान वृक्ष तोड जोमाने सुरू असुन असेच एक प्रकरणं बाऱ्हाळी परिसरातील निवळी येथे सापडले आहे.
उपवनसंरक्षक अमोल सातपुते साहेब, स.व.स ठाकूर साहेब यांच्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून बाऱ्हाळी बिटातील मौजे निवळी येथे अवैधरित्या सागवानाची कत्तल करून चोरट्या मार्गाने काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना वनविभाग यांच्या कर्मचाऱ्याकडून छापा मारून अंदाजे 2-3 घनमीटर माल जप्त करून कारवाई करण्यात आली आहे. पुढील कायदेशीर कार्यवाही वनपरिमंडळ अधिकारी अभय सेवलकर वनरक्षक धम्मपाल सोनकांबळे करीत आहेत. सदर माल वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आला.सदर कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.एस. डी हराळ,वनपरिमंडळ अधिकारी ए. पी.सेवलकर श्री.एम.एम पवार वनरक्षक डी. डी सोनकांबळे, पी. एन शिरुरे, आर.के राठोड, ए. एन राठोड,आर.एन कराड,एम जी गोपुलवाड डी. एस घुगे व मेहबूब शेख यांचा समावेश होता.सदर कारवाईत अंदाजित रक्कम 42000 ते 45000 रुपयांचा सागवान व ट्रॅक्टर अंदाजित किंमत 2 लाख हा मुद्देमाल जप्त करण्यात असुन यामुळे सागवान तस्करी करणाऱ्या टोळीवर थोड्याफार प्रमाणात का होईना जरब बसली आहे. बाराहाळी परिसरात चोरट्या मार्गाने सागवान तस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीवरून सदर कारवाई करण्यात आली. वनविभाग अशाच प्रकारे सागवान तस्कर विरोधात नेहमी धडक मोहीम राबविल्यास निश्चितच सागवान तस्कर यावर आळा बसेल असे जनतेतून बोलले जात आहे.

Previous articleकळवणला प्रजासत्ताकदिन उत्साहात साजरा
Next articleशॉकिंग! थंडीने तोडले सर्व विक्रम!! बुलडाण्यात पारा ९ डिग्रीच्या खाली; हजारो बुलडाणेकर गारठले, लहान मोठे
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here