राजेंद्र पाटील राऊत
दिव्यांग निराधारांच्या अपंग मागण्या घेऊन प्रहारचे भर पावसात आमरण उपोषण सुरु
……………………………………………………
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
मुखेड तालुक्यातील दिव्यांग, वृद्ध, निराधार यांचे मानधन गेल्या सहा महिन्या पासून थकलेले आहे. स्थानिक स्वराज संस्थेतील दिव्यांगांच्या 5 टक्के निधीची अंमलबजावणी करून वृद्ध, दिव्यांग निराधाराचे मानधन तात्काळ लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करावे. आदी मागण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्ष मुखेडच्या वतीने दि.27 सप्टेंबर रोजी भर पावसात युवा जिल्हाध्यक्ष शंकरभाऊ वडेवार व तालुकाध्यक्ष शिवानंद बंडे हे मुखेड तहसील कार्यालय समोर उपोषण केले. राज्यमंत्री बचू भाऊ कडू यांचे कार्यकर्ते भर पावसात भिजत काकडत बसलेले असताना सुद्धा प्रशासकीय कर्मचारी उपोषणकरत्याचे प्रश्न सोडवायला तयार नाहीत.यावेळी उपोषणकर्ते युवा जिल्हाध्यक्ष शंकरभाऊ वडेवार व तालुकाध्यक्ष शिवानंद बंडे सह शहराध्यक्ष साईनाथ बोईनवाड, सोशल मीडिया तालुकाध्यक्ष अनिल घायाळे, युवा तालुकाध्यक्ष हणमंत मुगवणे, युवा शहराध्यक्ष राहुल कंदमवर, युवा सचिव संतोष इंगोले, शहर उपाध्यक्ष सय्यद असलम, सतीश शिंदे, माधव बिलेवाड, संजय कांबळे, रावी गायकवाड,जीवन गोरलवाड, बबलू सय्यद, मोहन घायाळे, अविनाश जाधव,विकास राठोड आदी उपस्थित होते.