Home विदर्भ शॉकिंग! थंडीने तोडले सर्व विक्रम!! बुलडाण्यात पारा ९ डिग्रीच्या खाली; हजारो बुलडाणेकर...

शॉकिंग! थंडीने तोडले सर्व विक्रम!! बुलडाण्यात पारा ९ डिग्रीच्या खाली; हजारो बुलडाणेकर गारठले, लहान मोठे

103
0

राजेंद्र पाटील राऊत

शॉकिंग! थंडीने तोडले सर्व विक्रम!! बुलडाण्यात पारा ९ डिग्रीच्या खाली; हजारो बुलडाणेकर गारठले, लहान मोठे दवाखाने हाऊस फुल्ल.                                               (ब्युरो चीफ स्वप्निल देशमुख युवा मराठा न्यूज बुलडाणा)  उत्तर भारतात सातत्याने होणारी हिमवर्षा आणि त्यामुळे निर्माण झालेली धोकादायक शीतलहर यामुळे जिल्हा मुख्यालय असलेले बुलडाणा शहर मागील दोन आठवड्यांपासून अक्षरशः गारठले आहे. यामुळे तापमानात भीषण घट झाली असून, आज, २७ जानेवारीला या थंडीने ऑलटाइम ग्रेट असा ८.८ डिग्री सेल्सिअसचा आकडा गाठत हजारो बुलडाणेकरांना अक्षरशः हादरवले!

यंदाचा हिवाळा प्रामुख्याने डिसेंबर मध्यापासूनचा कालावधी बुलडाणा परिसर वासियांची शीत परीक्षा घेणारा ठरला आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात तापमापकाचा पारा सतत १३ ते १५ डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान रेंगाळत राहिला. मात्र जानेवारी महिन्याने आजवर रोजच कठोर परीक्षा घेतली, असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही.

चालू महिन्याच्या उत्तरार्धात थंडीने कहर माजवला! प्रजासत्ताक दिन व त्या आधीच्या दिवशी अर्थात २५ व २६ जानेवारीला तापमापकाचा पारा ९.२ डिग्रीवर स्थिरावला. थंडीत आणखी घट होईल हा नुसत्या कल्पनेनेच गारठवणारा अंदाज आज २७ जानेवारीला खरा ठरला!

आज बुलडाणा परिसरात किमान तापमान ८.८ डिग्री सेल्सिअसवर पोहोचले. ठीक याच्या विरुद्ध कमाल तापमान २५.४ डिग्री इतके नोंदविण्यात आले. परिणामी आज बुलडाणा शहर व परिसरातील लाखावर आबालवृद्ध हैराण परेशान झाल्याचे दिसून आले. यामुळे दमा, श्वसन रोग व गंभीर आजार असणाऱ्या वृद्धांचा त्रास वाढला असून, घराघरात सर्दी, पडसे, खोकला आणि तापाचे रुग्ण आढळून येत आहे. यामुळे लहान ,मध्यम दवाखाने, मेडिकल स्टोअर्स रुग्णांनी गजबजल्याचे दिसून येत आहे.

Previous articleवनविभागाच्या धडक कार्यवाहीत दोन लाखाचा मुद्देमाल जप्त
Next articleबाऱ्हळी येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here