Home नांदेड मुखेड तालुक्यातील ७९ गावे शंभर टक्के लसीकरण लसीकरणात पुढाकार घेऊन तालुका आरोग्य...

मुखेड तालुक्यातील ७९ गावे शंभर टक्के लसीकरण लसीकरणात पुढाकार घेऊन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांनी थेट बाजापेठेत जाऊन केले नागरिकांचे लसीकरण.

151
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील ७९ गावे शंभर टक्के लसीकरण लसीकरणात पुढाकार घेऊन तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रमेश गवाले यांनी थेट बाजापेठेत जाऊन केले नागरिकांचे लसीकरण.
नांदेड/मनोज बिरादार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क

मुखेड तालुक्यासाठी १ लाख ९० हजार ५१४ लसिकरण करण्याचे उद्दिष्ट असुन त्यापैकी १ लाख ५३ हजार ३०६ नागरिकांनी पहिला डोस तर ८४ हजार ५१३ नागरिकांनी दुसरा डोस घेतला आहे. एकून उद्दिष्टापैकी ३४ हजार ९३३ नागरिक बाहेरगावी स्थलांतरीत असुन १५ ते १८ वयोगटातील ०३ हजार ९२९ युवक-युवतीनी लस टोचुन घेतली आहे त्याचबरोबर आजपर्यंत तालुक्यातील ७९ गावे शंभर टक्के लसिकरणमुक्त झाल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.रमेश गवाले यांनी दिली.

तालुका प्रशासनाच्या वतीने गावोगावी जावुन मोठ्या प्रमाणात लसिकरण मोहिम राबविण्यात येत असुन या लसिकरण मोहिमेत मुखेड तालुक्यासाठी १ लाख ९० हजार ५१४ नागरिकांचे लसिकरण करण्याचे उद्दिष्ट असुन त्यापैकी (८० टक्के) म्हणजेच १ लाख ५३ हजार ३०६ जणांनी पहिला डोस घेतला आहे तर (४४ टक्के) म्हणजेच ८४ हजार ५१३ नागरिकांनी दुसराडोस घेतला आहे.

त्याचबरोबर उद्दिष्टापैकी ३४ हजार ९३३ नागरिक बाहेरगावी कामानिमित्त स्थलांतरित आहेत तसेच तालुक्यातील चांडोळा, डोरनाळी, मोटरगा, राजुरा बु, हिब्बट, राजुरा खुर्द, लादगा, राजा दापका, वर्ताळा, सांगवी बेनक यासह ७९ गावे शंभर टक्के लसिकरण मुक्त झाले आहेत त्याचबरोबर या लसिकरण मोहिमेत १५ ते १८ वयोगटातील युवक-युवतीसुद्धा मागे न रहाता ३ हजार ९२९ जणांनी लसिकरण करवून घेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला आहे.

तालुक्यातील ०७ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३४ आरोग्य उपकेंद्रातर्गत लसिकरणाचे काम जोमाने सुरु असुन तालुक्याला दिलेले शंभर टक्के टार्गेट पूर्ण करण्याच्या दिशेने मार्गक्रमण करत आहेत.या कामगिरीमुळे मुखेड तालुका नांदेड जिल्ह्यातील १६ तालुक्यामध्ये चौथ्या क्रमांकावर येण्याचा बहुमान मिळविला आहे.

याकामी तहसीलदार काशिनाथ पाटील, गटविकास अधिकारी तुकाराम भालके, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.रमेश गवाले, वैद्यकीय अधिक्षक डाॅ.सुधाकर तहाडे, मुख्याधिकारी महेश हांडे,गटशिक्षण अधिकारी व्यंकटराव माकणे,सर्व समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सहाय्यक, शिक्षक, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका व आशावर्कर यासह आरोग्य विभाग,तहसिल कार्यालय, शिक्षण विभाग,पंचायत समिती व नगर पालिकेचे अधिकारी व कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

—–चौकट—-
ओमायक्रॉनचा वाढता प्रार्दुभाव पाहता सर्व नागरिकांनी व १५ ते १८ वयोगटातील युवक-युवतींनी कोव्हिड लस घेवुन स्वतःला व परिवाराला सुरक्षित करावे.

डाॅ. रमेश गवाले
तालुका आरोग्य अधिकारी मुखेड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here