Home नांदेड प्रशासनातील गैरसमज दुर करण्यासाठी प्रशासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन.

प्रशासनातील गैरसमज दुर करण्यासाठी प्रशासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन.

162
0

राजेंद्र पाटील राऊत

प्रशासनातील गैरसमज दुर करण्यासाठी प्रशासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन.

नायगांव प्रतिनिधी/माधवराव घाटोळे युवा मराठा न्युज नेटवर्क

शेळगाव गौरी येथे महसुल व वनविभागाच्या वतीने प्रशासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नायगांव तहसिलचे उपविभागीय आधिकारी महेश जमदाडे यानी प्रशासकीय कामतील गैरसमज दुर व्हावा व सामान्य नागरिकांच्या समस्या जानुन घेण्यासाठी हा कार्यक्रम जिल्हाधिकारी डाँ.विपीन इंटनकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेत आहोत आसे प्रतिपादन याप्रंसगी केले.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग तहसील कार्यालय नायगाव महसूल मंडळ नरसी च्या वतीने शेळगाव गौरी येथे दिनांक 5 जानेवारी 2022 रोजी वार बुधवार वेळ सकाळी 11:00 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी महेश जमदाडे. तहसीलदार नायगांव गजानन शिंदे, पी. पी. फंजेवाड. गट विकास अधिकारी नायगाव.शिवसेना तालुकाप्रमुख रविन्द्र भिलवंडे,माधव पाटील कंधारे याची प्रमुख उपस्थिती होती.

शेळगांव (गौरी) ता,नायगांव हे गांव आदर्श गांव आसुन या ठिकाणी नरसी महसुल मंडळ च्या वतीने ग्रामपंचायत कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केला आसुन
महसुल व वन विभागाच्या आनेक योजनाची माहिती देऊन प्रशासन आपल्या प्रत्येक समस्यांचे निराकरण करण्यासाठी घेण्यात आला, या निमित्ताने गावातील शेतकरी.पांदण रस्ता.निराधार.लाईट आश्या आनेक बाबीवर चर्चा करण्यात आली,

या कार्यक्रमासाठी सा. पोलिस निरीक्षक रामतीर्थ चे विजय जाधव.मंडळधिकारी फुफाटे.तलाठी विजय पाटील जाधव.सरपंच प्राचार्य मनोहर तोटरे,उपसरपंच सौ,शालीनीताई पाटील.ग्रामविकास अधिकारी धनराज केत्ते.यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमासाठी नायगांव तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकारी.पदधिकारी. सरपंच.उपसरपंच.ग्रामपंचायत सदस्य.प्रतिष्ठित शेतकरी याची उपस्थिती होती.कार्यक्रमचे प्रास्तविक सरपंच प्राचार्य मनोहर तोटरे यानी हि योजना प्रथम या गावात घेतल्याबद्दल आभार व्यक्त केले.गावातील प्रमुख आडचणी,जिल्हा परिषद शाळा इमारत गावातील पांदण रस्ते याविषयी मागणी केली.यावेळी फुफाटे.पांचाळ.श्याम मुंढे,बामणीकर,मुखेडकर.कृषी साह्याक भुताळे.नितिन देगांवाकर.बाल विकास प्रकल्प आधिकारी राजुरे.सरपंच देवीदास राठोड.आवकाश पाटील.गोविंद पाटील डाकोरे.मेटकर.भालके आदी सरपंच उपस्थित होते.

शेळगांव गौरी येथील शेतकरी.तथा निराधार योजनेच्या महिला उपस्थित होते.यावेळी 18 आर्ज 30 निराधार लाभार्थ्याचे आर्ज,व शेतीच्या विविध योजनेच्या विषयावर चर्चा झाली.यावेळी माजी उपसरपंच हाणमत वाघमारे.नागनाथ शिंपाळे.सुधाकर पाटील.राजेन्द्र पाटील शेळगांवकर.संतोष देशमुख.सय्यद समदानी.मोहन मेडाबलमेवार.पत्रकार सुनिल रामदासी.तानाजी वाघमारे.गगाधर हवेलीकर.श्रीराम वाघमारे.याची उपस्थिती होती तर तलाठी विजय जाधव.ग्रामविकास अधिकारी धनराज कत्ते यानी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सुत्रसचालन प्रा,बबन काठेवाडे तर आभार राजेन्द्र पाटील शेळगांवकर यानी व्यक्त केले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here