Home विदर्भ पंतप्रधान आवास योजना लाभार्थ्यांना नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते भोगवटा प्रमाणपत्राचे वितरण

पंतप्रधान आवास योजना लाभार्थ्यांना नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते भोगवटा प्रमाणपत्राचे वितरण

150
0

राजेंद्र पाटील राऊत

पंतप्रधान आवास योजना लाभार्थ्यांना नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे यांच्या हस्ते भोगवटा प्रमाणपत्राचे वितरण

गडचिरोली–दि.४ (सुरज गुंडमवार ब्युरो चीफ युवा मराठा न्युज नेटवर्क)

मा. पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांनी भारत देशाला स्वतंत्र होवून ७५ वर्ष पूर्ण झाल्याने दि.१७/६/२०१५ ला पंतप्रधान आवास योजनेचा शुभारंभ करण्यात आला असुन २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक गरीब परिवाराला स्वताचा पक्का घर देण्याचा मा. नरेंद्रजी मोदी यांचा संकल्प पूर्ण होत आहे.
गडचिरोली शहरात सुध्दा गोकुलनगर,स्वामी विवेकानंदनगर,फुले वार्ड,हनुमान वार्ड,सर्वोदय वार्ड व गांधी वार्ड येथे पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून १५१९ घरकुल मंजूर झालेले असुन १५० घरकुलांचे बांधकाम पूर्ण झालेले आहेत.तर उर्वरित घरकुलांचे बांधकाम सुरू आहे.
ज्यांचे घरकुल बांधकाम पूर्ण झालेले आहे.अशा घरकुल धारक लाभार्थ्यांना गडचिरोली नगरपरिषद कडून भोगवटा प्रमाणत्राचे वितरण मा. नगराध्यक्ष सौ.योगीताताई पिपरे व ईतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
लाभार्थी प्रदिप नामदेव पिलीवार,निरंजना प्रकाश काटवे,जैवंता विठोबा दिवटे, हेमलता मनोहर आवारी,देवाजी किसन चुधरी,नितीन विजय टिंगुसले तसेच ईतर १०० घरकूल लाभार्थ्यांना यावेळी प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.
यावेळी नप उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर,पाणीपुरवठा सभापती मुक्तेश्वर काटवे,भाजपा जिल्हा महामंत्री तथा नगरसेवक प्रमोद पिपरे, नगरसेविका वैष्णवीताई नैताम,लाताताई लाटकर, निताताई उंदिरवाडे, सामाजिक कार्यकर्ते देवाजी लाटकर, विलास नैताम, पंतप्रधान आवास योजना MIS तज्ञ ब्रम्हानंद काळे,स्थापत्य अभियंता निकेश गहाने व लाभार्थी उपस्थित होते.

Previous articleकंचनपुरला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित क्रिडा सप्ताहाचे आयोजान
Next articleअनाथांची आई सामाजिक कार्यकर्त्या सिंधुताई सपकाळ यांचे निधन..
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here