राजेंद्र पाटील राऊत
गुहागर आगार येथे छावा प्रतिष्ठान (रत्नागिरी) आणि सर्व एस.टी.कर्मचारी वृंद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उस्फुर्त प्रतिसाद
युवा मराठा न्युज नेटवर्क, चँनल l रत्नागिरी I १० नोव्हेंबर
ब्युरो चिफ – सुनिल अनंत धावडे
सध्या एस.टी.कर्मचारी आपल्या “एस.टी राज्यशासनात विलीनीकरण” या रास्त मागणीसाठी राज्यातील सर्व कर्मचारी संपात आहेत.त्यामाध्यमातून प्रवासी सेवा जरी थांबली असली तरी जनसेवेचे व्रत हाती घेतलेल्या सर्व कर्मचाऱ्यांनी रक्तदान शिबिर आयोजित करून एक आगळावेगळा उपक्रम हाती घेतला.या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला.यामध्ये एकूण ६५ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या सर्व दात्यांचे प्रमाणपत्र देऊन आभार मानण्यात आले. यावेळी गुहागर तालुक्याचे माजी विद्यमान आमदार श्री.विनयजी नातूसाहेब आणि मनसेचे तालुकाध्यक्ष श्री.विनोद जानवळकर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत समस्त रा. म. प कर्मचारी यांनी केले.
यावेळी जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी चे डॉ.उत्तमराव कांबळे वैद्यकिय अधिकारी, डॉ.होमांगी सांवत, श्रीम. वाय. व्ही.सावंत, श्रीम. जयश्री कुंडलकर, श्रीम. श्रिया नवाथे, श्रीम. प्राजक्ता जाक्कर, श्रीम. रसिका जाधव, श्रीम. अनुश्री पोलाजी, श्री. एस.एस. पवार, श्री. एस.सी. वाडेकर सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी दुर्गा देवी ट्रस्ट आणि व्याडेश्वर ट्रस्ट यांचे सहकार्य लाभले तसेच सर्व एसटी कर्मचारी यांनी प्रचंड मेहनत घेतली.
छावा प्रतिष्ठान कडून कोरोनाच्या काळातील ७ वे रक्तदान शिबीर आयोजित केले गेले, त्यामुळे छावा प्रतिष्ठान रत्नागिरीच्या स्तुत्य उपक्रमाचे सर्व जिल्हा स्तरावरून व विशेष जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीकडून कौतुक होत आहे.