Home नांदेड एस टी कामगारांच्या आंदोलनास भाजप चा जाहीर पाठिंबा – खा.चिखलीकर

एस टी कामगारांच्या आंदोलनास भाजप चा जाहीर पाठिंबा – खा.चिखलीकर

108
0

राजेंद्र पाटील राऊत

एस टी कामगारांच्या आंदोलनास भाजप चा जाहीर पाठिंबा – खा.चिखलीकर

 

नांदेड ब्युरो चीफ / राजेश भांग युवा मराठा न्युज नेटवर्क

 

नांदेड – महाराष्ट्रात एस टी महामंडळाच्या कामगारांनी विलीनीकरण ची मागणी करत सुरू केलेल्या आंदोलनाला खा प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून भारतीय जनता पक्षाचा सक्रिय पाठींबा असल्याचे जाहीर केले यावेळी भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष प्रवीण साले यांनी सुद्धा समर्थनार्थ मार्गदर्शन केले

महाराष्टात एस टी महामंडळाच्या कामगारांनी प्रशासकीय यंत्रणेमध्ये एस टी महामंडळाचे विलीनीकरण करावे यासाठी कामगार संघटनांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनाला स्थानिक पातळीवर अधिकारी दबावतंत्राचा वापर करून आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे काही कामगार संघटनांनी नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या कडे माहिती दिली होती त्यामुळे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे स्वतः नांदेड एस टी आगार येथे जाऊन आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी झाले होते.

तर यावेळीउपस्थित कामगारांना संबंधित करताना खासदारांनी आंदोलनामध्ये भाजपा सदैव तुमच्या सोबत असल्याचे आश्वासन देत अधिकार्‍यांनी बळजबरीने आंदोलक कामगारांना त्रास देऊ नका म्हणून सुनावले, यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष प्रविण साले यांनी आंदोलकांनी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन करावे भाजपा प्रत्येक वेळी तूमच्यासाठी रस्त्यावर उतरून सहकार्य करणार असल्याचे जाहीर केले. यावेळी भाजपचे मनपा विरोधी पक्षनेते दिपकसिंह रावत, अनिलसिंह हजारी, शितल खांडील, प्रभू कपाटे, धिरज स्वामी, सचिन रावका, मारोती वाघ, कुणाल गजभारे, संदिप कर्हाळे, राज यादव, रुपेश व्यास, अमोल कुल्थिया, रोहित पाटील कांचन हुकुमसिंह गहलोत यांचे सोबत एस टी कामगार संघटनेचे एन डी पवार, रुपेश पुयड, एम डी गौस, एस बी ठाकुर, आतीश तोटावार, सूर्यकांत चापोळे, मंगेश कांबळे, रंजीतसिंग शिलेदार , पद्मश्रीताई राजे, कल्पनाताई यांच्या सह असंख्य आंदोलक उपस्थित होते

Previous articleसाखरीआगरमधील खलाशी बेपत्ता जयगडमधील मच्छिमार नौका नवेद २ चा शोध सुरू
Next articleबुलडाण्यात बळीराजाचे जंगी शक्ती प्रदर्शन!; शासन थरारले, प्रशासन हादरले, बुलडाणा दुमदुमले!!
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here