Home नांदेड मुखेड तालुक्यातील पिक विमा अतिवृष्टी होऊन सुद्धा न मिळण्याच्या मार्गावर 25% आगाऊ...

मुखेड तालुक्यातील पिक विमा अतिवृष्टी होऊन सुद्धा न मिळण्याच्या मार्गावर 25% आगाऊ रक्कम विमा कंपन्यांनी देण्याचे नाकारले.

153
0

राजेंद्र पाटील राऊत

मुखेड तालुक्यातील पिक विमा अतिवृष्टी होऊन सुद्धा न मिळण्याच्या मार्गावर 25% आगाऊ रक्कम विमा कंपन्यांनी देण्याचे नाकारले.
मुखेड तालुका प्रतिनिधी मनोज बिरादार (युवा मराठा न्यूज नेटवर्क)
तर रयत क्रांती संघटना विमा कंपन्या व त्यांचे मुजोर अधिकारी यांना धडा शिकविल्याशिवाय शांत बसणार नाही बालाजी पाटील ढोसणे.

सध्या चालु असलेल्या खालील गावात रँणडम पध्दतीने निवडलेल्या गावचे सरपंच व पोलीस पाटील यांनी पिक कापणी प्रयोगाला ऊपस्थितीत रहा कारण आपण त्या कमिटीचे सन्माननीय सदस्य आहात

आजच्या रिपोर्टवर ऊद्याचा पिक विमा आहे त्यामुळे नंतर मोर्चे काढुनही न्याय मिळणार नाही त्यामुळे आजच आपल्या गावातील पिक कापणी प्रयोगावर लक्ष देवुन चुकीचे रिपोर्ट संकलन होवु देवु नका पिक विमा मिळण्याच्या बाबतीत सकारत्मक अहवाल बनविण्यास भाग पाडा
तालुक्यातीलच कंपनीचा दलाल करतो शेतकर्‍यांचे नुकसान
कृषि विभाग ईफको टोकीयो पिक विमा कंपनीवर सासरवाडी असल्यासारखी मेहरबान असले सारखे का वागतात
अधिकारी आपल्या अधिकाराचा वापर शेतकरी विरोधीत जेवढ्या लवकर करतात तर पिकविमा कंपनी विरुध्द का करत नाहीत यामध्ये गौडबंगाल काय आहे मिलीभगत तर नाही ना?
शेतकरीमायबापानो जागरुक व्हा
पिक विमा मिळण्याचे तिन पध्दती असुन ऊत्पादन आधारीत म्हणजे सरसकट विमा मिळविण्याचे रिपोर्ट संकलन खालील महसुल मंडळातील गावात सुरु आहे.
शासन निर्णयाप्रमाणे जर पावसाचा सलग 24 दिवस खंड पडतो तर आगाऊ 25% टक्के आगाऊ रक्कम देण्याचे जिल्हाधिकारी यांचा अध्यादेश कसे काय नाकारतात??पिक विमा कंपन्या शासन निर्णयाचा आधार घेत नाकारतात व शेतकर्‍यांच्या भावनेशी खेळतात तर एका महसुल मंडळात 25% पेक्षा जास्त तक्रारी (इंटीमेशन) शेतकर्‍यांच्या असताना त्या सर्कल मध्ये पिक कापणी प्रयोगाचे सोंग कशाल्या लावले प्रशासनाने कारण कंपन्या शासन निर्णयाप्रमाणे (MID advisiry season) मधुन 25%अग्रीम नाकारत असेल ते पण जिआरचा आधार घेत तर शासनाचे अधिकारी व पालकमंञी जिल्हाचे खासदार काय फक्त शेतकर्‍यांच्या पाहणी दौर्‍यासाठी येवुन प्रसिध्दी करण्यापुरतेच का अशी घणाघाती टिका बालाजी पाटील ढोसणे यांनी केली.
कारण 25%टक्केपेक्षा जास्त शेतकर्‍यांच्या तक्रारी (इंटीमेशन)जर एका महसुल मंडळात आले तर तिथले कापणी प्रयोग रद्द करुन ते महसुल मंडळ बाधीत क्षेञ घोषीत करावयाचे असताना मग शासनाचे अधिकारी पिक विमा कंपनीवर कार्यवाही का करत नाही.पिक विमा कंपनी का अधिकार्‍यांची सासरवाडीची मालमत्ता आहे का? की कंपनीसोबत मिलीभगत आहे असा दाट संशय यानिमित्ताने ऊपस्थितीत होत आहे. यानिमित्ताने मि एक शेतकरी पुञ या नात्याने आवाहन करु ईच्छितो की खालील गावचे सरपंच,पोलीस पाटील व गावातील शेतकर्‍यांना व शेतकरी पुञाना नंम्र विनंती करतो की आपल्या गावात तलाठी,ग्रामसेवक,कृषिसहाय्यक व विमा कंपनीचे प्रतिनिधी येणार आहे व आले असतील मग आपल्या गावच्या पिक कापणी प्रयोगावर सरसकट पिक विमा मिळतो ऊत्पादन आधारीत पिक विमा यासाठी वस्तुनिष्ठ पंचनामे होत आहेत का याकडे सर्व शेतकरी व शेतकरी पुञानी लक्ष द्या.खालील महसुल मंडळातील गावे पिक कापणी प्रयोगासाठी निवडलेले आहेत.
महसुल मंडळे व त्यातील गावे खालील प्रमाणे आहेत,
▪️महसुल मंडळ मुखेड
आडमाळवाडी,खैरका,पांडुर्णी,बेरळी बु.,खु.,कोटग्याळ,तांदळी
▪️महसुल मंडळ जांब बु
लादगा,पाखंडेवाडी,वर्ताळा,जांब बु,शेळकेवाडी,होडांळा,वर्ताळा

▪️महसुल मंडळ जाहुर
खपराळा,एकलारा,नंदगाव प.दे.,मेथी,चोंडी,जाहुर

▪️महसुल मंडळ चांडोळा
चांडोळा,कोळगाव,कर्णा,खरब खंडगाव,माऊली,सलगरा खु.
▪️महसुल मंडळ मुक्रामाबाद
मुक्रामाबाद,हंगरगा,देगांव,नागराळ,रावी,मारजवाडी
▪️महसुल मंडळ बार्‍हाळी
तग्याळ,माकणी,हातराळ,कलंबर,दापका गु.,बार्‍हाळी
▪️महसुल मंडळ येवती
जिरगा,सुगांव बु.,भवानी तांडा,राठोडवाडी,आखरगा, होनवडज

▪️महसुल मंडळ अंबुलगा बु
भेडेगांव खु.,ईटग्याळ पदे,अंबुलगा,गोणेगांव,सांगवी भादेव,रावणगांव,
या गावात पिक कापणीचे प्रयोग होणार आहेत तरी जागरुक शेतकर्‍यांनी ग्रामसेवक,तलाठी,कृषिसहाय्यक व विमा कंपनीचा प्रतिनीधी यांना सर्पक करुन गावाचा खरोखर वस्तुनिष्ठ रिपोर्ट पाठवायलेत का त्यावर पिकविमा मिळतो हे तपासावे नाहीतर नंतर कितीही मोर्चे काढलो व रडलो तरी शासनाला व प्रशासनाला मायेचा पाझर फुटना त्यामुळे वरील गावातील शेतकर्‍यांनी शेतकरी पुञानी सज्ज रहावे.व बालाजी पाटील ढोसणे रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष नांदेड यांच्याशी संर्पक करावा.वरील गावातील सरपंच व पोलीस पाटलांनी पण बालाजी पाटील ढोसणे यांच्याशी 77868967777 या क्रमांकावर संर्पक साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here