Home मराठवाडा टुनकी येथे नंदू मोरे व सागर गोरे यांचा नागरी सत्कार. ————————————————–

टुनकी येथे नंदू मोरे व सागर गोरे यांचा नागरी सत्कार. ————————————————–

330
0

राजेंद्र पाटील राऊत

टुनकी येथे नंदू मोरे व सागर गोरे यांचा नागरी सत्कार.

————————————————–
ब्युरो चिफ: बबन निकम औरंगाबाद

वैजापूर तालुक्यातील टुनकी येथे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत सागर गोरे या तरुणांनी भारतीय रेल्वेच्या २०१८ च्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवल्याने रेल्वे विभागाच्या वतीने त्यास नियुक्तीपत्र देण्यात आले. गावातील दुसरा तरुण नंदू मोरे यांनी टपाल खात्यात अनेक वर्ष सेवा देत असतांना टपाल खात्याच्या वेळोवेळी होणाऱ्या परिक्षेत यश संपादन करून अनुसूचित जमातीच्या प्रवर्गातून महाराष्ट्रात प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले. त्याअनुषंगाने भारतीय टपाल खात्याच्या औरंगाबाद मुख्य कार्यालयात बढती झाल्याने गावकऱ्यांच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी मान्यवरांनी आप आपल्या भाषणात दोघांचे अभिनंदन करून कौतुक केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व विद्यमान संचालक संजय पाटील निकम, यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदरील कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संजय पा.निकम(मा.सभापती), आनंद निकम(उपसभापती), बाळा पाटील जाधव (रा. काँ.पार्टी जिल्हा उपाधयक्ष), निलेश केळे साहेब (सपोनि शिऊर पोलीस ठाणे),अजय पाटील साळुंके(हिं.ज.सेना), दौलत आण्णा निकम (भाजपा तालुका उपाध्यक्ष), दिलीप निकम(सरपंच), सुजित रंधे, बाबासाहेब ठेंगडे (नि.पोलीस हवालदार),विलास झालटे, अनिल मोईम, रावण निकम (पोलीस पाटील), ज्ञानेश्वर गोरे(ग्रा.सदस्य),गोरख गोरे, रमेश जाधव, गोरख झालटे,रमेश निकम, मच्छिंद्र निकम, शेळके दादा.पत्रकार हसन सैय्यद, पत्रकार राहूल आहेर, पत्रकार तैमूर सैय्यद, कैलास गोरे, काकासाहेब सोनवणे, केशव गोरे,भीमा आप्पा मोरे, अभिषेक गोरे, आकाश गोरे, यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleन्यू हायस्कूल येथे विद्यार्थ्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत….
Next articleबॅंकेतून काढलेली रक्कम दुचाकीच्या डिक्कीत ठेवून सलूनमध्ये दाढी करण्यास जाणे एका युवकाला चांगलेच महागात पडले 🛑
युवा मराठा न्यूजपेपर्स आणि वेब पोर्टलवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या व लेखांशी संपादक, मालक प्रकाशक  / अथवा मुद्रक सहमत असतीलच असे नाही. बातमी, लेख व जाहिरातीतील मजकूराची वैधता तपासून पाहू शकत नाही. बातमी, लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला युवा मराठा न्यूज जबाबदार नसून, संबंधित वार्ताहर, लेखक किंवा जाहिरातदारच आहे. युवा मराठा आँनलाईन वेब न्युज पोर्टल कुठलीही जबाबदारी घेत नाही. शिवाय वादविवाद हे मालेगांव, जि.नाशिक न्यायालयाअंतर्गतच चालविले जातील. भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here