राजेंद्र पाटील राऊत
सटाणा (शशिकांत पवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज)
सटाणा नगरपालिकेने गणपती मूर्ती विसर्जन हा कार्यक्रम राबवला असून सटाणा शहरात एकूण आठ ठिकाणी या गणपती मूर्तींचे संकलन करून विधिवतपणें गणपती विसर्जन कार्यक्रम हाती घेतला. गणपती विसर्जनात गणपतीच्या मूर्तीची विटंबना होऊ नये म्हणून तसेच पर्यावरण पूरक घटकांची काळजीपोटी नदीमध्ये होणारे प्रदूषण टाळण्यासाठी हा एक अभिनव उपक्रम सुरु केला असून याला मोठ्या प्रमाणात नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे . तर त्याला रोटरी क्लब ऑफ सटाणा या सारख्या समाजसेवीसंस्थांनी देखील नगरपालिके सोबत या कार्यक्रमास सहकार्य केले आहे .
शहरातील मूर्ती विसर्जन करण्यासाठी शहरातील आठ ठिकाणी अशी गणपती मूर्ती विसर्जन संकलन केंद्र उभी केली असून या माध्यमातून एका मोठ्या टाकीत गणपतीला विसर्जित करून ती गणपती मूर्ती संकलित कधी जाते तसेच हार , पुषपगुच्छ वगैरेसारखे निर्माल्य , निर्माल्य कलश मध्ये साठवण्याची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पर्यावरणाची हानी टळली आहे.
” *गणपती विसर्जन वेळी मोठया गर्दी होते त्याचप्रमाणे गणपती विसर्जन करताना अनेक अप्रिय घटना घडतात आणि सर्वात महत्वाचे म्हणजे निर्माल्य व गणेश मूर्तींचे विसर्जन नदी नाल्यांमध्ये केल्यामुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते ते टाळण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने आम्ही हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.”*
*सुनिल मोरे , लोकनियुक्त नगराध्यक्ष सटाणा नगर पालिका*