राजेंद्र पाटील राऊत
सटाणा,(शशिकांत पवार प्रतिनिधी युवा मराठा न्युज नेटवर्क)
नवे निरपूर येथील शेतकऱ्यांची लाखोंची फसवणूक झाली असून सटाणा शहरातील एच डी एफ सी बँकेत लाखोंचा पिक कर्ज घोटाळा झाला असून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे.
आधीच शेतकऱ्यांचे अनेक नैसर्गिक आपत्तीनी शेतकरी हैराण असतानाच बागलाण तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची सटाणा शाखेच्या एचडीएफसी बँकेच्या कृषी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांयाने शेतक-यांना लाखो रुपयांना गंडा घातला आहे. याबाबत बँकेच्या प्रशासनाने देखील या घोटाळ्याला दुजोरा दिलाअसून दिनांक १६सप्टेंबर पर्यंत ज्या शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लाखांचा घोटाळा झाला असल्याचे सत्य स्मोर आले आहे.व तसा हा घोटाळा झाल्याचा दुजोरा देखील बँक प्रशासनाने दिला आहे .
एचडीएफसी बँकेत कृषी विभागाकडे कर्ज प्रकरणचे काम करण्यासाठी असलेल्या कर्चारी मनोज मेधने असे या कर्मचाऱ्याचे नाव असून या कर्मचाऱ्याने अनेक शेतकऱ्यांना तुमचे पिक कर्ज चे हप्ते झाले असून तुमचे पीक कर्जाचे हप्ते भरणे गरजेचे असून ते तात्काळ भरा नाहीतर जप्ती सारखी कारवाई करावी लागेल असे सांगून अनेक शेतकऱ्यांकडून त्याने लाखो रुपये ची माया जमा केली असून सदरील कर्मचारी १६सप्टेंबरपासून फरार आहे ज्यावेळेस बँकेच्या प्रशासनाने शेतकऱ्यांना फोन करून तुम्ही तुमचा हप्ता का भरला नाही अशी विचारणा केली तेव्हा या कर्मचाऱ्याचे पितळ उघडे पडले त्यावेळेस शेतकऱ्यांनी एचडीएफसीच्या प्रशासनाकडे धाव घेत आम्ही तुमच्या कर्मचाऱ्याकडे कर्जाचे पूर्ण रक्कम जमा केले आहेत असे सांगितल्याने प्रशासनाने सदर कर्मचारी १६ तारखेपासून फरार आहे असे घोषित केले व त्या कर्मचारीने अद्यापही कुठल्याही शेतकऱ्याच्या कर्ज खात्यामध्ये कर्जाची रक्कम भरलेली आढळून आली नाही त्यामुळे आधीच कर्जाचा बोजात कमरेपर्यंत बुडालेला शेतकरी आता गळ्यापर्यंत फसल्याची अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. तर काही शेतकरयांना या कर्मचाऱ्याने बँकेचा निल दाखला देखील देऊन उतारावरील बोजा कमी करून दिला आहे. असे एकूण आतापर्यंत १७ शेतकऱ्यांची फसवणुक झाल्याचे बँकेचे तपास अधिकारी ( investigation manager) गांगुर्डे यांनी सांगीतले.
सदरील कर्मचारी हा बँकेचा कर्मचारी होता त्यामुळेआम्ही त्याच्याकडे आमचे कर्ज खात्याचे पैसे जमा केले म्हणूनआता पुन्हा आम्ही कर्ज भरणार नाहीत तरी हे कर्ज भरून घेण्याची जबाबदारी आता बँक प्रशासनाची आहे असे शेतकऱ्यांचे म्हणणे असून आम्ही आता पुन्हा कर्ज आता भरणार नाहीत सदर कर्मचाऱ्यांचे काय करावे ते बँकेने करावे व आम्हाला न्याय द्यावा अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडले आहे.
बँक प्रशासनाशी संपर्क साधला असता या घोटाळ्याची व्याप्ती जास्त असल्याची शक्यता नाकारता येत नाही असे प्रशासनाने सांगितले त्यामुळे प्रशासन देखील हतबल आहे
परंतु एवढा मोठा बँक घोटाळा झाला असतानादेखील अद्यापि ह्या कर्मचाऱ्या विरुद्ध पोलीस स्टेशन व इतर ठिकाणी कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही.
” आम्हीं सदरील कर्मचारी हा बँकेचा होता म्हणून आम्ही हे कर्जाचे हप्ते त्याच्या कडे जमा केले आहेत त्यामुळे आम्ही आता पुन्हा हफ्ता भरणार नाही तरी त्या कर्मचाऱ्यांकडून घ्या नाही तर बँकेने भरा आम्हाला फक्तं निल दाखला बँकेने द्यावा अन्यथा आम्ही आंदोलनं करू”
_मुन्ना सूर्यवंशी, निरपुर ,फसवणूक झालेले शेतकरी_